सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 684 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारला असून 69364 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीच्या दरांतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज बाजारात चांदीचा भावही 1715 रुपये प्रति किलोने वाढून 83065 रुपयांवर पोहोचला आहे. तत्पूर्वी देशाच्या अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करण्यात आल्यानंतर, सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली होती.
आयबीजेएने आज जारी केलेले दर -
- आज 23 कॅरेट सोन्याचा दर 681 रुपयांनी वधारून 69086 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे.
- 22 कॅरेट सोन्याचा दर 624 रुपयांनी वाढून 63535 रुपये प्रति 10 गॅमवर पोहोचला आहे.
- 18 कॅरेट सोन्याचा दर 513 रुपयांनी वधारून 52023 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
- 14 कॅरेट सोन्याचा दर आज 400 रुपयांच्या तेजीसह 40578 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचला आहे.
सोने-चांदीचे हे दर आयबीजेएने जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरीची मजुरी लावण्यात आलेली नाही. आपल्या शहरात सोन्या-चांदीच्या दरात 1 हजार ते 2 हजार रुपयांपर्यंत फरक पडू शकतो.
जीएसटीसह सोन्याचांदीचा भाव असा -
-24 कॅरेट सोन्याचा भाव 71444 रुपये प्रति 10 ग्रॅम
-23 कॅरेट सोन्याचा भाव 71158 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट सोन्याचा भाव 65441 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 18 कॅरेट सोन्याचा भाव 53583 रुपये प्रति 10 ग्रॅम
- चांदी 2491.95 रुपये जीएसटीसह 85556 रुपये किलोवर पोहोचली आहे.