Join us

Gold Price Today : सोन्याची झळाळी ओसरली, चांदीही घसरली; जाणून घ्या, काय आहेत 22 आणि 24 kt चे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 2:54 PM

जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या. याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावरही दिसून आला.

नवी दिल्ली- सोने आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली. जागतिक बाजारात दोन्हींच्याही किंमती घसरल्या. याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावरही दिसून आला. कोरोना व्हायरसचे संक्रमण कमी झाल्याने आता जगभरातील अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सकारात्मक आकडे जारी झाले. यामुळे, गुंवणूकदारांनाही दिलासा मिळाला आणि सोन्याची झळाली ओसली. 

मागच्या व्यापार सत्रात सोन्याच्या दरात 388 रुपये आणि चांदीच्या दरात 920 रुपयांची घसरण दिसून आली. एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सराफा बाजारातही शुक्रवारी सोन्याचा दर 388 रुपयांनी घसरून 47,917 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला हाता. याच प्रकारे चांदीचा दरही 920 रुपयांनी कमी होऊन 69,369 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला होता. यापूर्वीच्या व्यापार सत्रात हा दर 70,289 रुपये प्रति किलो ग्रॅम एवढा होता.

जबरदस्त...! फक्त 7 दिवसांत पैसे डबल...! तुमच्या जवळ आहे का 'मालामाल विकली'चा हा शेअर?

वेगवेगळ्या शहरांत 22kt आणि 24kt सोन्याचे दर - Good Returns वेबसाइटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1 ग्रॅमवर 5,126, 8 ग्रॅमवर 41,008, 10 ग्रॅमवर 51,260 आणि 100 ग्रॅमवर 5,12,600 सुरू आहे. तर  22 कॅरेट सोन्याचा दर 47,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची संधी, एकाच दिवसात व्हाल लखपती! जाणून घ्या, कुठे आणि कसा गुंतवायचा पैसा

मुख्य शहरांतील सोन्याच्या दराचा विचार करता, दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 47,110 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 51,260 रुपये, असा सुरू आहे. मुंबईत 22 कॅरेट सोने 48,310 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49,310 रुपये सुरू आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 47,910 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 50,710 रुपये, चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा दर 46,160 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 50,360 रुपये सुरू आहे. हे दर प्रति 10 ग्रॅम सोन्याचे आहेत.

Ambani VS Adani: मुकेश अंबानींचा 'ताज' धोक्यात, गौतम अदानी लवकरच होऊ शकतात भारताचे नवे 'सरताज'

चांदीचा विचार करता वेबसाइटनुसार, प्रति किलो ग्रॅम चांदीचा दर 71,600 रुपये प्रति किलो सुरू आहे. दिल्लीत चांदी 71,600 रुपये प्रति किलो असून मुंबई आणि कोलकात्यातही चांदीची किंमत हीच आहे. मात्र, चेन्नईत चांदीचा दर 76,300 रुपये प्रति किलो एवढा आहे.

 

टॅग्स :सोनंचांदीदागिनेबाजारमुंबईदिल्ली