आज सोनं आणि चांदीचा भाव जबर्दस्त घसरला आहे. सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 73000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली आली आहे. तसेच, चांदीच्या दरातही 89000 च्या जवळपास आली आहे. आयबीजेएने जारी केलेल्य किंमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव आज गेल्या बंद 73979 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 706 रुपयांनी कमी होत 73273 रुपयांवर आला आहे. तसेच, चांदीच्या दरातही 2255 रुपये प्रति किलोची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 703 रुपयांनी घसरून 73683 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 72980 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दरही आता 647 रुपयांनी घसरून 67118 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 471 रुपयांनी घसरून 54955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. 14 कॅरेट सोन्याच्या दरातही 413 रुपयांची घसरण दिसून आली आहे. ते 42865 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. चांदीचा विचार करता आज चांदीत 2255 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 91555 रुपये प्रति वरून कमी होऊन 89300 रुपयांवर आला आहे.
जीएसटीसह सोन्या-चांदीचा दर -आज जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा दर 75169 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. इतर इतर चार्जेससह ते सुमारे 82686 रुपये प्रति 10 ग्रॅम वर जाईल. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 69131 रुपयांवर पोहोचला आहे. ज्वेलरी मेकिंग चार्जेस आणि नफा जोडल्यानंतर, ते सुमारे 76044 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने मिळेल.
जीएसटीसह 18 कॅरेट सोन्याचा भाव 56603 रुपयांवर आहे. ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफ्यासह हा भाव 62264 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचतो. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी सह 75471 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाईल. तर, चांदीचा भाव जीएसटी सह 91979 रुपये प्रति किलोवर जाईल. महत्वाचे म्हणजे, वेगवेगळ्या शहरांत हा दर काही प्रमाणात कमी अधिकही असू शकतो.