Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात घसरण; दोन मिनिटांत जाणून घ्या आजची किंमत...

Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात घसरण; दोन मिनिटांत जाणून घ्या आजची किंमत...

Gold Rate Silver Price Today 2nd August 2021: 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते. मात्र, या कॅरेट्या सोन्याचे दागिने बनविता येत नाहीत. दागिने बनविण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:16 PM2021-08-02T15:16:05+5:302021-08-02T15:17:30+5:30

Gold Rate Silver Price Today 2nd August 2021: 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते. मात्र, या कॅरेट्या सोन्याचे दागिने बनविता येत नाहीत. दागिने बनविण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

Gold-Silver Price fall; Find out today's gold rate in two minutes ... | Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात घसरण; दोन मिनिटांत जाणून घ्या आजची किंमत...

Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात घसरण; दोन मिनिटांत जाणून घ्या आजची किंमत...

Gold Rate Silver Price Today 2nd August 2021: सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. जागतिक बाजारातील कमकुवतपणामुळे सोन्या चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे आज सोमवारीच 999 शुद्धतेच्या सोन्याचा (Gold Rate) दर 325 रुपयांनी घसरला होता. हा दर 48105 प्रति ग्रॅम वर आला आहे. गेल्या आठवड्य़ाच्या शेवटी सोने 48430 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. (Gold, silver Rate falling at months starting.)

दुसरीकडे चांदीच्या दरातही 117 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे चांदी 67936 रुपये प्रति किलो होती. IJBA च्या वेबसाईटनुसार सोमवारी सोन्याच्या 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 4810.00 प्रति एक ग्रॅम झाला होता. तर 22 कॅरेट सोन्याचा (916 शुद्धता) दर 4406.00 प्रति एक ग्रॅम झाला होता. 

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या दर...
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या गोल्ड ज्वेलरीच्या घाऊक दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता. काही वेळातच तुम्हाला एसएमएसद्वारे दर मिळून जाईल. IJBA चा हा क्रमांक आहे. 

सोन्याची शुद्धता कशी तपासाल...?
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते. मात्र, या कॅरेट्या सोन्याचे दागिने बनविता येत नाहीत. दागिने बनविण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोने घेत असाल तर त्यामध्ये 2 कॅरेट अन्य धातू मिक्स केलेला असतो. दागिन्यांच्या शुद्धतेचे हॉलमार्कशी संबंधीत 5 प्रकारची चिन्हे असतात. 

यामध्ये एक कॅरेटशी संबंधीत असते. 22 कॅरेट - 916, 21 कॅरेट - 875, 18 कॅरेट- 750 चा आकडा लिहिलेला असतो. जर 14 कॅरेटचा पगार असेल तर 585 कॅरेट लिहिलेले असते.
 

Web Title: Gold-Silver Price fall; Find out today's gold rate in two minutes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.