रशिया-युक्रेन युद्धामुळे पुन्हा विक्रम रचेल असे वाटत असताना सोन्याने मोठी घसरण नोंदविली आहे. गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरांनी 3,500 रुपयांची घट नोंदविली आहे. एमसीएक्स (MCX)वर एप्रिलच्या डिलिव्हरीचे सोने आज 300 रुपयांहून अधिक दराने उघडले. यामध्ये दहा वाजेस्तोवर आणखी घसरण झाली. सध्या हे सोने 51,830 रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यापार करत आहे.
सोमवारी सोन्याचा बाजार 52,304 रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. आज हे सोने 52,001 रुपयांच्या भावावर उघडले. सोन्याने 51,827 रुपयांचा निचांकी स्तर गाठला होता. चांदीच्या किंमतीत देखील मोठूी घट झाली. मे मधील डिलिव्हरीची चांदी 676 रुपयांनी घसरली. सध्या चांदी 68,168 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. सोमवारी ही चांदी 68,844 रुपयांवर बंद झाली होती. आज 68,500 च्या दरावर उघडली.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यांच्यात चर्चा सुरु झाली आहे. यामुळे बाजारात सोन्या चांदीच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. जगभरातील शेअर बाजारांतदेखील तेजी परत येत आहे. याचबरोबर अमेरिकी फेडरल रिझर्व्हची आजपासून दोन दिवसांची बैठक सुरु झाली आहे. यामध्ये व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या दोन दिवसांत सोन्या चांदीच्या दरात मोठे चढउतार होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे समर्थन मुल्य $1934-1920 वर आहे तर प्रतिकार $1962-1980 प्रति औंस आहे. त्याचप्रमाणे, चांदीचा समर्थन मुल्य $ 24.70-24.35 वर आहे आणि प्रतिरोध $ 25.48-25.62 वर आहे. रुपयाच्या बाबतीत, सोन्याला 51950-51680 रुपयांवर समर्थन मुल्य आहे आणि 52480-52740 रुपयांवर प्रतिरोध आहे. त्याचप्रमाणे, चांदीचा आधार 68050-67335 रुपये आहे तर त्याची प्रतिरोधक पातळी 69220-70000 रुपये आहे.