Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?

Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?

Gold-Silver Price: परदेशी बाजारांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घरसण झालीय. यानंतर बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात ५० रुपयांची घसरण होऊन दर ७४,६०० रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाले. पण चांदीत मात्र तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:11 AM2024-05-23T11:11:37+5:302024-05-23T11:15:36+5:30

Gold-Silver Price: परदेशी बाजारांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घरसण झालीय. यानंतर बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात ५० रुपयांची घसरण होऊन दर ७४,६०० रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाले. पण चांदीत मात्र तेजी दिसून आली.

Gold Silver Price In terms of returns silver has left behind gold see how much the price has been details | Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?

Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?

Gold-Silver Price: परदेशी बाजारांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घरसण झालीय. यानंतर बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात ५० रुपयांची घसरण होऊन दर ७४,६०० रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाले. तर चांदी ६०० रुपयांच्या तेजीसह ९५,१०० रुपये प्रति किलोवर बंद झाली. यापूर्वीच्या कामकाजाच्या सत्रादरम्यान चांदी ९४,५०० रुपयांवर बंद झाली होती. चांदीला इतकी चमक मिळाली की चांदी या बाजाराची हॉट कमोडिटी बनली. बुधवारी स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा भाव ९४,४०० रुपये प्रति किलो होता, तर मंगळवारी तो ९४,६३६ रुपये प्रति किलोवर पोहोचला. किरकोळ बाजारात तो ९२,८७३ प्रति किलोच्या (जीएसटीशिवाय) पातळीवर पोहोचला आहे.
 

"आमच्या हिशोबानुसार चांदीची लँडेड कॉस्ट एक लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळे चांदी ९५,००० रुपयांच्या जवळपास असेल तर, ती अजूनही डिस्काऊंटवर ट्रेड करत आहे. भू-राजकीय कारणं आणि चीनच्या खरेदी यामुळे सोन्याच्या दरात तेजीनं वाढ झाली. परंतु चांदी इतक्या वेगानं वाढली नाही. सोनं-चांदीच्या वाढीचं प्रमाण ज्या पद्धतीनं जातं, त्यात अजूनही बरीच तफावत आहे, त्यामुळे ती लवकरच एक लाखाचा टप्पा ओलांडताना दिसू शकते," अशी प्रतिक्रिया अग्रवाल इम्पेक्सचे प्रमुख संजय अग्रवाल यांनी दिली.
 

गुंतवणूकदारांनी राहावं सावध
 

"चांदीमध्ये अजूनही बरीच ताकद आहे. परताव्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला मागे टाकलं असले तरी चांदीनं अजूनही सोन्याची तेजी पूर्णपणे पकडलेली नाही. सोन्यानं वार्षिक १७ टक्के परतावा दिला आहे, तर चांदीने २२.२९ टक्के परतावा दिला आहे. किंबहुना जेव्हा भू-राजकीय परिस्थिती अशी बनते, तेव्हा प्रिशियस कमोडिटीमध्ये विना लॉजिक सातत्यानं तेजी दिसून येते. परंतु अशात गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे. गुंतवणुकीसाठी येणाऱ्यांना सध्या पैसे कमवता येणार नाहीत. सर्वसामान्य गुंतवणूकदार सध्या यापासून दूर आहेत, ते ना विक्री करत आहेत, ना एन्ट्री घेत आहेत. ही चांगली बाब आहे," अशी माहिती सिल्व्हर एम्पोरियमचे प्रमुख राहुल मेहता यांनी दिली.

Web Title: Gold Silver Price In terms of returns silver has left behind gold see how much the price has been details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.