Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price: रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतीयांना मोठा फटका; सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या दर

Gold Silver Price: रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतीयांना मोठा फटका; सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या दर

रशिया यूक्रेन यांच्यातील युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:38 PM2022-02-24T13:38:05+5:302022-02-24T14:23:19+5:30

रशिया यूक्रेन यांच्यातील युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.

Gold Silver Price: Russia-Ukraine war hits Indians; Huge rise in gold-silver prices, know the rates | Gold Silver Price: रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतीयांना मोठा फटका; सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या दर

Gold Silver Price: रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतीयांना मोठा फटका; सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ, जाणून घ्या दर

नवी दिल्ली – रशियानं यूक्रेनसोबत युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे या युद्धाचे आता जागतिक पडसाद पाहायला मिळत आहे. यूक्रेनवर रशियानं मिसाइल हल्ले केले आहेत. अनेक शहरांत स्फोटाचे आवाज ऐकू येऊ लागलेत. रशियाच्या या कारवाईवर पाश्चिमात्य देशांनी निर्बंधाची कारवाई केली आहे. मात्र जागतिक पातळीवर अनेक देशांना या युद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सराफा बाजारात सोन्याचे भाव ५१ हजार आणि चांदी ६६ हजारांच्या वर गेले आहेत. रशिया यूक्रेन यांच्यातील युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव १३७० रुपयांनी वधारुन ५१ हजार ४१९ रुपयांवर पोहचला आहे. तर चांदी ६६ हजार ५०१ रुपये प्रति किलो झाली आहे. IBJA च्या वेबसाईटवर सध्या हे दर आहेत. बुधवारी सायंकाळी सराफा बाजारात मार्केट बंद होताना सोन्याचा दर ५०,०४९ रुपये होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार १०० इतका आहे.

१० ग्रॅम सोन्यासाठी सुमारे ५३००० रुपये खर्च करावे लागतील

गुरुवारी इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, २४ कॅरेट शुद्ध सोने प्रति १० ग्रॅम १३७० रुपयांनी महाग झाले आणि बुधवारी बाजार बंद किंमतीच्या तुलनेत ५१४१९ रुपयांवर उघडले. यावर ३ टक्के जीएसटी जोडला तर तो ५२९६१ रुपयांच्या आसपास बसतो. त्याचवेळी चांदीचा भाव २२९८ रुपयांनी वाढून ६६५०१ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटी जोडल्यानंतर ते ६८४९६ रुपये प्रति किलो मिळेल.

सोन्याचे दर ५५ हजारांपर्यंत जातील  

युद्ध असेच सुरू राहील तर २४ कॅरेट सोन्याचे प्रति तोळा भाव ५५ हजारांपर्यंत जाईल असा आंदाज व्यक्त जळगाव शहर सराफ असोसिएशनचे सचिव तसेच सोने भावाचे जाणकार स्वरूपकुमार लुंकड यांनी व्यक्त केला आहे. मात्र युद्ध संपताच हा भाव त्याच वेगाने खालीही येतील असंही मत व्यक्त केलं आहे. यामुळे सोन्याची खरेदी किंवा इन्व्हेंस्ट करतांना ग्राहकांनी काळजी घ्यावी असा सल्लाही लुंकड यांनी दिला आहे.

भारतीय शेअर बाजार कोसळला

गुरुवारी सकाळी रशिया यूक्रेन युद्धाला सुरुवात होताच शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली. गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसा काढला. त्यामुळे शेअर बाजार २ हजार अंकानी कोसळला. तर निफ्टी तब्बल ५८० अंकानी घसरला. यामुळे जवळपास ५ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. रशिया आणि यूक्रेन युद्धाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार आहे. एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टीसीएस सर्व शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Web Title: Gold Silver Price: Russia-Ukraine war hits Indians; Huge rise in gold-silver prices, know the rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.