Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, पाहा आजचे नवे दर; जाणून घ्या का झाली घसरण?

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, पाहा आजचे नवे दर; जाणून घ्या का झाली घसरण?

Gold Silver Price Today 3rd February 2023: शुक्रवारी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 06:44 PM2023-02-03T18:44:10+5:302023-02-03T18:44:35+5:30

Gold Silver Price Today 3rd February 2023: शुक्रवारी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. 

Gold Silver Price Today A big drop in the price of gold and silver 3 February 2023 see today s new price Find out why it fell | Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, पाहा आजचे नवे दर; जाणून घ्या का झाली घसरण?

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, पाहा आजचे नवे दर; जाणून घ्या का झाली घसरण?

Gold Silver Price Today 3rd February 2023: तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,000 रुपयांच्या जवळ आल्यानंतर किमतीत करेक्शन झाले आहे. अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली. मात्र शुक्रवारी त्यात मोठी घसरण झाली. यासोबतच चांदीच्या किमतीतही 2000 रुपयांहून अधिक घसरण झाल्याचे दिसून आले. सततच्या तेजीच्या काळात तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 58,000 रुपयांच्या जवळपास आला. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे.

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 681 रुपयांनी घसरला आणि 57,929 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. त्याच वेळी, गेल्या कामकाजाच्या सत्रात सोन्याचा दर 58,610 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. याशिवाय चांदीचा दरही 2,045 रुपयांनी घसरून 70,335 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,913 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा दर 23.38 डॉलर प्रति औंस झाला.

काय म्हणतायत तज्ज्ञ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरांबाबत केलेल्या आक्रमक टिप्पण्णींनंतर सोन्याच्या किमती नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. यानंतर, गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे, कॉमेक्समध्ये सोन्याचे दर त्यांच्या सर्वोच्च स्तरावरून खाली आले आणि गुरुवारी 1.94 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्च विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी म्हटले की, आज आपण बाजारात अधिक अस्थिरता पाहू शकतो, कारण गुंतवणूकदार अमेरिकेतील बिगरशेती रोजगार, बेरोजगारी दर डेटावर लक्ष केंद्रित करतील.

Web Title: Gold Silver Price Today A big drop in the price of gold and silver 3 February 2023 see today s new price Find out why it fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.