भारतीय सराफा बाजारात सोमवारी (22 ऑगस्ट) सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दरात प्रति दहा ग्रॅम 315 रुपयांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरातही किलोमागे 635 रुपयांची घट झाली आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, सोमवारी सोन्याचा दर 315 रुपयांच्या घसरणीसह 51,679 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. तर या पूर्वीच्या व्यापार सत्रात सोन्याचा दर 51,994 प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. तसेच, चांदीच्या दरातही 635 रुपयांची घसरण झाली असून भारतीय सराफा बाजारात चांदी 55,416 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,737 अमेरिकन डॉलर प्रती औंस एवढ्या तराने व्यवहार करत आहे. तसेच चांदीही ग्लोबल बाजारात 18.90 अमेरिकन डॉलर प्रति औंस एवढ्या दरावर ट्रेड करत आहे.
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनिअर अॅनालिस्ट (कॉमोडिटीज) तपन पटेल यांच्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर, डॉलरमधील वाढ आणि यूएस फेडरल बँकेकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता असतानाच सपाट आहेत.