Gold Silver Price Today : दीपावली आणि धनत्रयोदशीला अजून बराच कालावधी आहे. त्याआधीही सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. चांदी आज १६१५ रुपयांनी वधारून ९२२६८ रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचली. आयबीजेएनुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६७ रुपयांनी वाढून ७६०८२ रुपयांवर पोहोचला आहे. सोनं आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.
१४ ते २३ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ४६५ रुपयांनी वाढून ७५७७७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४२८ रुपयांनी वाढून ६९६९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ३५१ रुपयांनी वाढला असून तो ५७०६२ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २७३ रुपयांनी वाढून ४४५०८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
जीएसटीसह सोने-चांदीचे दर
जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७८३६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये जीएसटीचे २२८२ रुपये आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७८०५० रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २२७३ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७१७८१ रुपयांवर पोहोचलंय. यात जीएसटी म्हणून २०९० रुपयांची भर पडली आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव आता १७११ रुपये जीएसटीसह ५८७७३ रुपयांवर पोहोचलाय. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा यांचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९५०५४ रुपयांवर पोहोचलाय.