Join us

Gold Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घट, सोनं आलं ५४ हजार रुपयांखाली, तर चांदीही घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 10:30 AM

Gold Silver Price Today: भारतीय वायदेबाजार आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मंगळवारी घसरण दिसून आली. तसेच सराफा बाजारात चांदीचे दरही घसरले आहेत.

नवी दिल्ली - भारतीय वायदेबाजार आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मंगळवारी घसरण दिसून आली. तसेच सराफा बाजारात चांदीचे दरही घसरले आहेत. मंगळवारी सकाळी ९.५ वाजेपर्यंत देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याची किंमत आधीच्या दरापेक्षा ३८७ रुपयांनी घसरून ५३ हजार ४६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. तर चांदीची किंमत १२५८ रुपयांनी घसरून ६५ हजार १९१ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.  

देशांतर्गत मार्केटमध्ये स्पॉट गोल्डच्या किमतीमध्ये सोमवारी तेजी दिसून आली होती. सोने २२७ रुपयांनी वधारून ५४ हजार ३८६ रुपयांवर बंद झाले होते. या आधीच्या सत्रामध्ये सोने ५४ हजार १५९ रुपयांवर पोहोचले होते. दुसरीकडे चांदीने  ११६६ रुपयांनी झेप घेऊन ६७ हजार रुपयांपर्यंत मजल मारली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत ४.१० डॉलर (०.२३ टक्के) वाढून १७७३ डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. तर चांदीचे दर जवळपास स्थिर आहेत. तिची किंमत ०.११ डॉलर किंवा ४९ टक्के वाढीसह २२.३४ डॉलर प्रति औंस या स्तरावर कायम आहेत.

दसरा दिवाळीनंतर आता लग्नसराईचे दिवस सुरू झाल्याने सोने आणि चांदीचे दर वधारले आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने सोन्या चांदीच्या दागिन्यांना खूप मागणी असते. 

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय