Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today : अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा लेटेस्ट दर

Gold Silver Price Today : अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा लेटेस्ट दर

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतीत बुधवारी घसरण झाल्याचं दिसून आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 06:00 PM2023-04-19T18:00:08+5:302023-04-19T18:02:02+5:30

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतीत बुधवारी घसरण झाल्याचं दिसून आलं.

Gold Silver Price Today Gold price falls before Akshay Tritiya silver also cheap View the latest rates | Gold Silver Price Today : अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा लेटेस्ट दर

Gold Silver Price Today : अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा लेटेस्ट दर

Gold Silver Price Today : अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) आधी बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेला लोक सोनं खरेदी करतात. अक्षय तृतीयेच्या आधी सोन्याला चांगली मागणी दिसून येत आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणंदेखील शुभ मानलं जातं. मात्र यावेळी सराफा बाजारात विशेष मागणी दिसून येत नाही. परिणामी सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. बुधवारी संध्याकाळी एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ५ जून २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १.११ टक्क्यांनी किंवा ६७१ रुपयांनी घसरून ५९,८१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

चांदीतही घसरण
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण दिसून आली. बुधवारी संध्याकाळी एमसीएक्सवर चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतीत मोठी घसरण दिसून आली. ५ मे २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव MCX वर १.४० टक्क्यांनी किंवा १०५२ रुपयांनी कमी होऊन ७४,१९७ रुपये प्रति किलो होता. त्याच वेळी, ५ जुलै २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव १.३३ टक्क्यांनी किंवा १०१५ रुपयांनी कमी होऊन ७५,५२० रुपये प्रति किलो होता.

जागतिक स्तरावर किंमत
जागतिक पातळीवर बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग नुसार कॉमेक्सवरील सोन्याचा फायदा दर १.५९ टक्क्यांनी किंवा ३२.२० रुपयांनी घसरून १९८७.५० डॉलर्स प्रति औंसवर ट्रेड करत होती. त्याच वेळी, सोन्याचा जागतिक स्पॉट दर १.५४ टक्क्यांनी घसरून ३०.९६ डॉलर्स प्रति औंस वरून १९७४.४९ वर ट्रेड करत होता.

Web Title: Gold Silver Price Today Gold price falls before Akshay Tritiya silver also cheap View the latest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.