Join us

Gold Latest Price: गुड न्यूज! फेस्‍ट‍िव्ह सिझनपूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घसरण; पटापट खरेदी करा, जाणून घ्या लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 5:41 PM

खरे तर सराफा बाजाराच्या तुलनेत एमसीएक्‍सच्या तुलनेत कमी घसरण दिसून आली आहे. जाणकारांच्या मते, आपण श्राद्ध पक्षाचा विचार केला नाही, तर ही सोने खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत होती. मात्र, आता गेल्या काही दिवसांत या धातूंच्या दरात घसरण दिसून येत आहे. आता सोन्याचे दर घसरून दोन महिन्यांपूर्वीच्य पातळीवर आले आहेत. आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सराफा आणि एमसीएक्‍स मार्केट (MCX Market) दोन्हींतही लाल चिन्हावर ट्रेडिंग दिसून आली आहे.

खरे तर सराफा बाजाराच्या तुलनेत एमसीएक्‍सच्या तुलनेत कमी घसरण दिसून आली आहे. जाणकारांच्या मते, आपण श्राद्ध पक्षाचा विचार केला नाही, तर ही सोने खरेदीसाठी चांगली वेळ आहे. तसेच, नवरात्र‍ीमध्ये सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी येण्याची शक्यता आहे.

चांदीच्या दरात माठी घसरण - इंडिया बुलियंस एसोसिएशनकडून (https://ibjarates.com) बुधवारी जारी झालेल्या किंमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 382 रुपयांची घसरण दिसून आली आहे. आता सोन्याचा दर या 50296 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर आला आहे. तसेच चांदीच्या दरातही 1215 रुपये प्रत‍ि क‍िलोची घसरण दिसून आली असून आता चांदीचा दर 56055 रुपये प्रत‍ि क‍िलो ग्रॅमवर आला आहे. यापूर्वी 21 जुलैला सोन्याचा दर 49972 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर आला होता.

MCX वरही सोनं-चांदी घसरलं -MCX वरही सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. ऑक्‍टोबर ड‍िलिव्हरी असलेले सोने 63 रुपयांनी घसरून 50075 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर ट्रेड होत आहे. चांदीच्या दरातही मोठी घट दिसून आली आहे. डिसेंबर ड‍िलिव्हरी असलेली चांदी 120 रु. प्रत‍ि क‍िलो ने घसरून 56691 वर ट्रेड करत आहे.

इंडिया बुलियंस असोसिएशनने (https://ibjarates.com) बुधवारी जारी केलेल्या किंमतीनुसार, 23 कॅरेट गोल्‍ड 50095 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर आहे. तसेच 22 कॅरेट सोने 46071 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम, 20 कॅरेट सोने 37722 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट गोल्‍ड 29423 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर आहे.

टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकबाजार