सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 1580 रुपयांनी घसरून 76556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला. तर चांदीच्या दरात 2748 रुपयांची घसरण झाली आहे. हा दर IBA चा असून यात GST चा समावेश करण्यात आलेला नाही. आज चांदी 90153 रुपये प्रति किलो दराने खुली झाली.
14 ते 23 कॅरेट सोन्याचा दर - आज अर्थात गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचा दर 1574 रुपयांनी घसरून 76249 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1448 रुपयांनी घसरून 70125 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याचा दर 1125 रुपयांनी घसरून 57417 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 14 कॅरेट सोन्याचा भाव आज 925 रुपयांनी घसरून 44785 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला.
जीएसटीसह सोन्या-चांदीचा दर -आता 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 78852 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. यात 2296 रुपये जीएसटीचे जोडण्यात आले आहे. याशिवाय, जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याची किंमत 78536 रुपये आहे. यात 3% GST नुसार 2287 रुपये जोडण्यात आले आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर GST सह 72228 रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये 2103 रुपये GST म्हणून जोडले आहेत. तसेच, जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव 92857 रुपयांवर पोहोचला आहे.