Join us  

Gold-Silver Price: दोन दिवसांत सोनं एक हजार रुपयांनी स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या आजचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 1:26 PM

गेल्या व्यापार सत्रात, सोन्याचा दर दोन टक्क्यांनी कमी झाला होता. तर चांदीचा दर 2.5 टक्के प्रति किलो ग्रॅमने कमी झाला होता. मार्च महिन्यात सोन्याचा दर जवळपास 44,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही कमी झाला होता. (Gold silver price today)

नवी दिल्ली - गेल्या सत्रातील जोरदार घसरणीनंतर आज पुन्हा एकदा स्थानिक वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. एमसीएक्सवर वायदा बाजारातील सोन्याचा दर 0.12 टक्यांनी घसरून 48619 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदीचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 70722 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला आहे. सोन्याचा दर दोन दिवसांत एक हजार रुपयांनी घसरला आहे. तर चांदीचा दर दोन हजार रुपयांनी घसरला आहे. (Gold silver price today june 4 2021 In two days gold became cheaper by one thousand rupees, silver also fell)

गेल्या व्यापार सत्रात, सोन्याचा दर दोन टक्क्यांनी कमी झाला होता. तर चांदीचा दर 2.5 टक्के प्रति किलो ग्रॅमने कमी झाला होता. मार्च महिन्यात सोन्याचा दर जवळपास 44,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही कमी झाला होता.

Reliance कडून यावर्षी वेतन न घेण्याची मुकेश अंबानींची घोषणा; पाहा किती आहे त्यांचं वेतन

अशी आहे जागतीक बाजारातील स्थिती -आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने मजबूत डॉलरमुळे दोन आठवड्यांचा विचार करता खालच्या स्थरावर पोहोचले आहे.  स्पॉट सोने 0.4 टक्क्यांनी घसरून 1,862.68 डॉलर प्रति औंस वर आले आहे. गेल्या व्यापार सत्रात यात दोन टक्क्यांची घसरण झाली होती. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 27.31 डॉलर प्रति औंसवर आली होते. प्लॅटिनम 0.7 टक्क्यांनी घसरून 1,148.50 डॉलरवर आले होते. डॉलर इंडेक्स तीन आठवड्यात 90.543 वर पोहोचला आहे. 

कसा ठरतो सोन्याचा दर? -कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर, रेपो रेट जैथे; EMI वर काय परिणाम?

लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा दर - आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.

सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते. 

टॅग्स :सोनंचांदीबाजारदागिने