Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी, 750 रुपयांनी महागलं गोल्ड; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी, 750 रुपयांनी महागलं गोल्ड; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

Gold Silver Price Today : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 09:31 AM2023-10-21T09:31:07+5:302023-10-21T09:32:02+5:30

Gold Silver Price Today : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम...!

Gold Silver Price Today Record rise in the price of gold and silver, gold expensive by 750 rupees Check the latest rate | सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी, 750 रुपयांनी महागलं गोल्ड; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी, 750 रुपयांनी महागलं गोल्ड; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

सोन्या चांदीच्या दरात सातत्याने तेजी दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी 57 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचलेल्या सोन्याचा भाव आता 60 हजार रुपयांच्याही वर गेला आहे. य शिवाय चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात गेल्या शुक्रवारी सोन्याच्या दरात 750 रुपयांची वाढ झाली आणि सोने 61,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. या आधीच्या व्यवहाराच्या सत्रात सोने 60,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

जाणून घ्या चांदीचा दर -
एचडीएफसी सिक्योरिटीजमधील वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी म्हटले आहे की, ‘‘परदेशी बाजारातील जोरदार तेजीमुळे शुक्रवारी सोन्याचा दर वाढला आहे.’’ चांदीही 500 रुपयांच्या वाढीसह 74,700 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. जागतिक बाजाराचा विचार करता सोनेही 1,980 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. याच बरोबर, चांदीही 23.20 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. गांधी यांनी म्हटले आहे की, पश्चिम आशियात सुरू असलेल्या ताणावामुळे शुक्रवारी बाजारात स्पॉट गोल्डने जवळपास चार महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.

सातत्याने वाढतोय भाव -
इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवरही होताना दिसत आहे. या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या युद्धापूर्वी सोन्याच्या किमतीत घट झाली होती. सोने अगदी 57 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्याही खाली पोहोचले होते. मात्र आता सोन्याचा भाव 60 हजारांच्याही पुढे गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Gold Silver Price Today Record rise in the price of gold and silver, gold expensive by 750 rupees Check the latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.