Gold Silver Price Today : सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६ रुपयांनी वाढून ७६४२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीच्या दरात आज प्रति किलो ३७० रुपयांनी वाढ झाली. आज चांदी सरासरी ९०३५० रुपयांवर उघडली. आयबीजेएनं हे दर जारी केले आहेत. यामध्ये जीएसटी लागू नाही. तुमच्या शहरात यात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.
दिल्लीत सोन्याचा दर - लाइव्ह मिंटनुसार, दिल्लीत आज सोन्याचा भाव ७७९६३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. काल तो ७८१६३ रुपये होता आणि गेल्या आठवड्यात २८ तारखेला सोन्याचा भाव ७७६९३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज दिल्लीत चांदीचा भाव ९४७०० रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. काल चांदीचा दर ९४५०० रुपये प्रति किलो होता.
जयपूरमध्ये आज सोन्याचा दर - पिंक सिटी जयपूरमध्ये आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७७९५६ रुपये झालाय. काल येथे सोन्याचा भाव ७८१५६ रुपये होता तर गेल्या आठवड्यात २८ नोव्हेंबर रोजी तो ७७६८६ रुपये होता. तर जयपुरमध्ये आज चांदीचा दर ९४४०० रुपयांवर पोहोचला.
लखनौमध्ये सोन्याचे दर - आज लखनौमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७७५१० रुपये आहे. काल तो ७८१७९ रुपये आणि गेल्या आठवड्यात २८ तारखेला सोन्याचा भाव ७७७०९ रुपये होता.