Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price : आज पुन्हा सोन्याला झळाळी! चांदीही चमकली, तुमच्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा दर काय?

Gold Silver Price : आज पुन्हा सोन्याला झळाळी! चांदीही चमकली, तुमच्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा दर काय?

Gold Silver Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीला पुन्हा झळाली आली आहे. येत्या काळात सोने ७८ हजार रुपयांचा टप्प पार करेल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:40 PM2024-09-30T12:40:41+5:302024-09-30T12:41:42+5:30

Gold Silver Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीला पुन्हा झळाली आली आहे. येत्या काळात सोने ७८ हजार रुपयांचा टप्प पार करेल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

Gold Silver Price What to expect in the coming months | Gold Silver Price : आज पुन्हा सोन्याला झळाळी! चांदीही चमकली, तुमच्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा दर काय?

Gold Silver Price : आज पुन्हा सोन्याला झळाळी! चांदीही चमकली, तुमच्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा दर काय?

Gold Silver Price : नुकताच गणेश उत्सव गेला असून आता सर्वांना नवरात्रीचे वेध लागले आहेत. सणासुदीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज सोने सुमारे २०७ रुपयांच्या वाढीसह ७५ हजार ८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले तर चांदी ४९ रुपयांनी महाग झाली असून ९१ हजार ६९१ रुपये प्रति किलोने विकली जात आहे. नवरात्री ते दसरा, दीपावली, विवाहसोहळे, ख्रिसमस आणि नवीन वर्ष या सणांच्या आधी पितृ पक्षादरम्यान लोक आधीच सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत आहेत.

MCX वर सोन्याच्या चांदीची नवीन अपडेट
वायदेबाजारातही सोने भाव खाताना पाहायला मिळत आहे. आज, 5 डिसेंबर रोजी वायदे डिलिव्हरी असलेले सोने ७५९७९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले. सकाळी सव्वा नऊवाजेपर्यंत ६४५३ लाख रुपयांच्या सोन्याच्या ऑर्डर बुक झाल्या आहेत. तसेच, ५ फेब्रुवारी रोजी वायदे डिलिव्हरी असलेले सोने ७६५२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले. सकाळी सव्वानऊ वाजेपर्यंत ३५२ लॉट सोन्याची खरेदी झाली. दरम्यान, ४ ऑक्टोबरसाठी सोन्याच्या बुकिंगमध्ये घट झाली आहे. कारण आता फक्त ४ दिवस उरले आहेत. ४ ऑक्टोबरच्या वायदे डिलिव्हरीसाठी सोने ७५३७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. तर मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये, 5 डिसेंबर रोजी चांदी ९१५१९ रुपये प्रति किलोवर उघडली आणि ९१६९१ रुपये प्रति किलोच्या उच्चांकावर पोहोचली. तर ५ मार्च रोजी चांदी ९४१३२ रुपये प्रति किलोवर उघडली होती आणि ९४१३४ वर व्यवहार करत आहे.

मुंबईतील सोन्याचा दर
मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर १५० रुपये प्रति १० ग्रॅम कमी झाला आहे. तर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर १६० रुपये प्रति १० ग्रॅम कमी झाला आहे. चांदीचे दरही मुंबईत घरसले आहेत. मुंबईत १ किलो शुद्ध चांदीचा दर ९४ हजार ९०० रुपये आहे. काल तो ९५ हजार होता. म्हणजे १०० रुपयांनी चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे.

सोने ७८ हजारांचा टप्पा ओलांडणार?
नवरात्रीनंतर देशात लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. लग्नाचा हंगाम हा परंपरेने जास्त खरेदीचा आणि सोन्याच्या वाढत्या किमतींचा हंगाम असतो. यंदाही लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी जोरात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात सोने ७८ हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Gold Silver Price What to expect in the coming months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.