Join us

Budget 2024 सादर होण्याआधीच सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सध्याची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 10:57 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प २०२४

Budget 2024, Gold Rates Silver: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशातील वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. एकीकडे चांदीचा भाव ७२ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर सोन्याचा भाव ६३ हजार रुपयांच्या खाली आला. मात्र, सोन्या-चांदीशी संबंधित तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की सरकार बजेटमध्ये आयात शुल्क कमी करू शकते आणि पॅनकार्डशिवाय ५ लाख रुपयांपर्यंतच्या सोन्याच्या खरेदीला मान्यता देऊ शकते. फेडरल रिझर्व्हने व्याजदर होल्डवर ठेवले आहेत. त्याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या दरावरही दिसून येत आहे.

सोन्याच्या भावात घसरण

देशातील वायदे बाजार मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सकाळी १० वाजता सोन्याचा भाव ८५ रुपयांच्या घसरणीसह ६२,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. मात्र, आज सोने ६२,६३९ रुपयांवर उघडले. सोन्याचा भावही ट्रेडिंग सत्रात ६२,६१५ रुपयांवर पोहोचला. एका दिवसापूर्वी सोन्याचा भाव ६२,७३५ रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत हा परिणाम दिसू शकतो.

चांदीही स्वस्त झाली

अर्थसंकल्पीय भाषणाच्या एक तास आधी चांदीच्या दरातही घसरण दिसून आली. सकाळी १० वाजता चांदीचा भाव २७७ रुपयांच्या घसरणीसह ७१,९७० रुपये प्रति किलोवर आला. ट्रेडिंग सत्रादरम्यान चांदीची किंमत ७१,९४० रुपयांवर पोहोचली. मात्र, चांदीचा भाव ७२,१४६ रुपयांवर उघडला. एका दिवसापूर्वी चांदीचा भाव ७२,२४७ रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. परंतु किमतींवर परिणाम होईल अशी एखादी गोष्ट अर्थसंकल्पात जाहीर होण्याची शक्यता कमी आहे, असे काही जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :सोनंचांदीअर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामन