Join us

सोने-चांदीच्या दरात झाली घसरण; निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाढले होते भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 6:38 AM

Gold-silver prices : गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू होण्यासह इतरही व्यवहारांना परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदी वाढू लागली व यामुळे त्यांचे भावदेखील वधारले.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल झाल्यानंतर भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात गुरुवारी घसरण झाली. ५० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेल्या सोन्यात ३०० रुपयाची घसरण होऊन ते ४९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले, तर ७४ हजार रुपयांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू होण्यासह इतरही व्यवहारांना परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदी वाढू लागली व यामुळे त्यांचे भावदेखील वधारले.  १ जून रोजी सुवर्ण बाजार सुरू झाला त्या दिवशी ४९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर सोने पोहचले होते. पुन्हा यात वाढ होत जाऊन ५ जून रोजी ते ४९ हजार ६०० रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले व त्यात वाढ होत जाऊन ९ जून रोजी सोने ५० हजार रुपये प्रति तोळावर पोहोचले. मात्र १० जून रोजी त्यात ३०० रुपयांची घसरण झाली व ते ४७  हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

- १ जून रोजी निर्बंध शिथिल झाल्यानंतर ७३ हजार रुपये प्रति किलोवर चांदीचे भाव पोहोचले व पुन्हा हळूहळू वाढ होत जाऊन ९ जून रोजी ती ७४ हजार रुपये प्रति किलोवर ती पोहोचली. त्यानंतर १० जून रोजी त्यात ५०० रुपयाची घसरण होऊन चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

टॅग्स :सोनंचांदी