Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर सारखे वरखाली होत आहेत. शुक्रवारी (२० सप्टेंबर)सोन्याच्या दरात पुन्हा वाढ दिसून येत आहे. तर चांदी सतत वरखाली होत आहे. आज सोन्याचा दर ७३ हजार ६१९ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला तर चांदी १०८ रुपयांनी स्वस्त झाली. चांदीचा दर आता ८८ हजार ४५० रुपये प्रति किलो झाला आहे. तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर काय आहेत?
वेगवेगळ्या शहरातील दर काय आहेत?राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹ ६८,३९० आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,५९० आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ६८,२४० रुपये आहे, तर २४ कॅरेटची किंमत ७४,४४० रुपये आहे. अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे ६८,२९० आणि ६८,२४० आहे, तर २४ कॅरेटची किंमत दोन्ही ठिकाणी ७४,४९० आणि ७४,४४० आहे. गुरुग्राम, लखनौ आणि जयपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६८,३९० वर स्थिर आहे आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,५९० वर स्थिर आहे.
MCX वर सोन्याचे ताजे दरआज ४ ऑक्टोबरला वायदा डिलिव्हरी होणारे सोने ८७ रुपये महाग झाले. सोन्याचा दर ७३ हजार ६१९ रुपये दरावर उघडला असून ७३ हजार ५२५ वर व्यवहार करत आहे. सोबत ५ डिसेंबरचे वायदा डिलिव्हरीवाले सोने ७४ हजार ३०४ रूपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले असून सकाळी १०:१४ वाजता ९०३६ लाखांच्या सोन्याचा व्यवहार झाला होता.
चांदीची स्थिती काय?मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये, ५ डिसेंबर रोजी चांदी ८९ हजार ९९२ रुपये प्रति किलोने उघडली आणि ८९ हजार ८६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर ५ मार्च रोजी चांदी ९२ हजार ३९८ रुपये प्रति किलोवर उघडली होती.
तुमचं सोनं शुद्ध आहे का?सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (Indian Standard Organization) द्वारे हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० असे लिहिले आहे. बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक १८ कॅरेट देखील वापरतात. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध मानले जाते.
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे ९१ टक्के शुद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे ९% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी ते दागिने घडवण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
मिस्ड कॉलवरून किंमत जाणून घ्या२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, सतत अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.