Join us  

Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 2:04 PM

Gold Silver Price 30 May: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरानं पकडलेला वेग गुरुवारी काहीसा मंदावला. पाहा काय आहे आजचा लेटेस्ट दर

Gold Silver Price 30 May: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरानं पकडलेला वेग गुरुवारी काहीसा मंदावला. आयबीजेएच्या ताज्या दरानुसार, ३० मे रोजी चांदी १४३८ रुपये प्रति किलोनं घसरून ९२६८० रुपये झाली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४२३ रुपयांनी घसरून ७१,९९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २९ मे रोजी चांदी ९४२८० रुपये प्रति किलोच्या नव्या उच्चांकी पातळीवर होती. तर २१ मे रोजी सोन्यानं ७४२२२ रुपयांचा उच्चांक गाठला होता. 

सोन्या-चांदीचे दर 

  • २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१,९९० रुपये प्रति १० ग्रॅम
  • २३ कॅरेट सोन्याचा भाव ७१,७०२ रुपये प्रति १० ग्रॅम
  • २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५,९४३ रुपये प्रति १० ग्रॅम
  • १८ कॅरेट सोन्याचा भाव ५३,९९३ रुपये प्रति १० ग्रॅम
  • १४ कॅरेट सोन्याचा भाव ४२,११४ रुपये प्रति १० ग्रॅम
  • चांदीचा दर ९२,६८० रुपये प्रति किलो 

गुरुवार, ३० मे रोजी जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याचा दर ७३८५३ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. इतर शुल्कांसह हा दर ८१२३८ रुपयांच्या जवळपास असेल. तर आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ३८७ रुपयांनी कमी होऊन ६६७१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा जोडल्यानंतर २२ कॅरेटचा भाव ७४७१३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. 

आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १२८ रुपयांनी कमी होऊन ४३,९९३ रुपये झाला आहे. तर जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा मिळून १८ कॅरेट सोन्याचा भाव ६११७४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह ७४१४९ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. तर जीएसटीसह चांदीचा भाव ९५४६० रुपये प्रति किलो होईल. 

(टीप - सोन्या-चांदीचे दर आयबीजेएद्वारे जारी करण्यात येतात. यामध्ये जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. तुमच्या शहरात सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० रुपयांची तफावत असू शकते.)

 

टॅग्स :सोनंचांदी