Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Rate: सोने चांदीच्या दरातील घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate: सोने चांदीच्या दरातील घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे दर

खरे तर अमेरिकेतील बाजारांत बॉन्ड यील्ड वाढल्याने सोने स्वस्त होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता सोन्याऐवजी बॉन्डमध्ये पैसे लावत आहेत आणि त्यांना येथे चांगल्याप्रकरे रिटर्न्सदेखील मिळत आहेत. (Gold silver rates updates)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 01:34 PM2021-03-22T13:34:08+5:302021-03-22T13:35:44+5:30

खरे तर अमेरिकेतील बाजारांत बॉन्ड यील्ड वाढल्याने सोने स्वस्त होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता सोन्याऐवजी बॉन्डमध्ये पैसे लावत आहेत आणि त्यांना येथे चांगल्याप्रकरे रिटर्न्सदेखील मिळत आहेत. (Gold silver rates updates)

Gold Silver Rate: Gold silver rates updates on 22 march 2021 | Gold Silver Rate: सोने चांदीच्या दरातील घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate: सोने चांदीच्या दरातील घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली - तुर्कीच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांना पदावरून बाजुला केल्याचा परिणाम आज ग्लोबल मार्केटवरही दिसून आला. यामुळे सोने आणि चांदीचे दर ग्लोबल मार्केटमध्येही घसरले आहेत. जागतीक बाजारात स्पॉट गोल्डमध्ये 0.3 टक्क्यांची घसरण होऊन ते 1,739.80 डॉलर प्रती औंसवर आले आहेत. तर गोल्ड फ्यूचरमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण होऊन ते 1738.80 डॉलर प्रति औंसवर आले आहे. Gold Silver Rate: Gold silver rates updates on 22 march 2021

याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला. सोमवारी एमसीएक्समध्ये सोन्याचा दर 45 हजार रुपयांच्याही खाली आला. सोन्याच्या दरात सोमवारी 0.1 टक्का घसरण झाली. आणि ते 44,981 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले. तर सिल्व्हर फ्यूचर 1.4 टक्के घसरून 66,562 रुपये प्रति किलोवर पोहोचले. सोन्याच्या दरात आणखी चढ उतार दिसू शकतो. सोन्याचे दर जोवर 1760 डॉलर प्रति औंसच्या खाली येत नाहीत तोवर यात हा ट्रेंड सुरूच राहील. सध्या स्थानिक बाजारात सोन्याला 44,680 रुपये प्रति दहा ग्रॅमवर सपोर्ट मिळताना दिसत आहे.

भारतात सोन्याची मागणी वाढली  
खरे तर अमेरिकेतील बाजारांत बॉन्ड यील्ड वाढल्याने सोने स्वस्त होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता सोन्याऐवजी बॉन्डमध्ये पैसे लावत आहेत आणि त्यांना येथे चांगल्याप्रकरे रिटर्न्सदेखील मिळत आहेत. यावर्षी सोन्याच्या जागतीक दरात 8 टक्क्यांची घसरण झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर 291 रुपयांनी घसरून 44,059 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. याआधीच्या व्यवहार सत्रात, सोने 44,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. 

चांदीच्या दरातही 1,096 रुपयांची घसरण होऊन ते 65,958 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आले आहे. यापूर्वी चांदीचा दर 67,054 रुपये प्रति किलोग्रॅम होता. इंटरनॅशनल मार्केटच्या तुलनेत भारतात सोन्याच्या दरात. अधिक घसरण पाहायला मिळत आहे. येथे सन आणि लग्नाच्या सिझनमुळे सोने आणि सोन्याचे दागिणे दोन्हीची मागणी वाढल्याचे दिसत आहे.

कसा ठरतो सोन्याचा भाव? - 
कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.

लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा भाव - 
आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.
 

Web Title: Gold Silver Rate: Gold silver rates updates on 22 march 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.