Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold-Silver Price Today: दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा दर

Gold-Silver Price Today: दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा दर

Gold-Silver Price Today: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. तर दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दरातही मोठी तेजी दिसून येतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 02:55 PM2024-11-04T14:55:19+5:302024-11-04T14:57:06+5:30

Gold-Silver Price Today: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. तर दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दरातही मोठी तेजी दिसून येतेय.

Gold Silver rate Today Even after Diwali gold silver prices rise See 14 to 24 carat gold price | Gold-Silver Price Today: दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा दर

Gold-Silver Price Today: दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा दर

Gold-Silver Price Today: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. तर दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दरातही मोठी तेजी दिसून येतेय. दिवाळीनंतर आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,४४५ रुपये प्रति १० ग्रॅम वर उघडला, जो शुक्रवारच्या ७८,४२५ रुपयांच्या बंद भावापेक्षा २० रुपयांनी अधिक आहे. चांदीच्या दरात मात्र ९३४ रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर आयबीएनं जाहीर केला आहे, ज्यावर जीएसटीचा समावेश नाही. आज चांदी ९४,४३५ रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली. मात्र, सराफा बाजारात आज सोन्याचे दर दिवाळीच्या तुलनेत कमी आहेत. दिवाळीत सोन्याचा भाव ७९,५५७ रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला. तर, धनत्रयोदशीनंतर सोन्यानं ७९,५८१ रुपयांचा नवा उच्चांकही गाठला.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १० रुपयांनी वाढून ७८,७३१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १९ रुपयांनी वाढून ७१,८५४ रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज १५ रुपयांनी वाढला असून तो ४८,८३४ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ११ रुपयांनी वाढून ४५,८९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

सोन्याच्या दरात तेजी का?

जगातील भूराजकीय तणावाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत, कारण असुरक्षित वातावरणात गुंतवणुकीसाठी सोनं सर्वोत्तम मानलं जातं. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच जगातील सर्व मध्यवर्ती बँकाही सोन्याचा साठा वाढवत आहेत.

Web Title: Gold Silver rate Today Even after Diwali gold silver prices rise See 14 to 24 carat gold price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.