Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold-Silver Rates Today : सोनं, चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold-Silver Rates Today : सोनं, चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या लेटेस्ट दर...

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,778 डॉलर प्रती औंस झाला असून चांदीचा दर 26.25 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:35 PM2021-07-01T18:35:58+5:302021-07-01T18:37:19+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,778 डॉलर प्रती औंस झाला असून चांदीचा दर 26.25 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

Gold silver rates 1 July 2021 Gold silver rates today bounce in gold and silver prices | Gold-Silver Rates Today : सोनं, चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold-Silver Rates Today : सोनं, चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या लेटेस्ट दर...

नवी दिल्ली - जागतिक बाजारांत मौल्यवान धातूंच्या किंमतीत सुधारणा आणि रुपयाच्या विनिमय दरात घसरण झाली आहे. यातच दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा दर 526 रुपयांनी वाढला असून 46,310 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली. या पूर्वीच्या व्यवसाय सत्रात सोने 45,784 रुपयांवर वर बंद झाले होते. (Gold silver rates 1 July 2021 Gold silver rates today bounce in gold and silver prices)

याच बरोबर, चांदीच्या दरांतही 1,231 रुपयांनी वाढ झाली असून चांदी 68,654 रुपये प्रती किलो ग्रॅमवर पोहोचली आहे. गत व्यवसाय सत्रात चांदीचा दर 67,423 रुपये एवढा होता.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘कॉमेक्समध्ये सोन्याच्या किंमतीत चांगली सुधारणा झाल्याने आणि रुपयांची किंमत कमी झाल्याने दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये 526 रुपयांची तेजी आली आहे.’’

देशात महागाईचा भडका! साबण-शॅम्पूच्या किंमती पक्त 3 महिन्यांत 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या!

परदेशी चलन विनिमय बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवसाय सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य पाच पैशांनी कमी होऊन 74.37 रुपये प्रती डॉलरवर आले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,778 डॉलर प्रती औंस झाला असून चांदीचा दर 26.25 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

कसा ठरतो सोन्याचा दर? -
कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.

आता PM किसान योजनेतील 6000 रुपयांच्या वार्षिक हप्त्यासह मिळवा 3000 रुपये मासिक पेन्शन, असा घ्या फायदा

लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा दर - 
आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.

सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.


 

Web Title: Gold silver rates 1 July 2021 Gold silver rates today bounce in gold and silver prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.