Gold-Silver Rates 26 April : काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत होती. परंतु आता यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सराफा बाजारात आज, 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याची किंमत आता 72,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा अधिक झालीये, तर चांदीचे दर 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा अधिक झालेत. 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,360 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 81456 रुपये झाली आहे.
इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने (India Bullion And Jewellers Association) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 24 कॅरेटच्या शुद्ध सोन्याचा दर 72094 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जे आज (शुक्रवार) सकाळी 72360 रुपये इतका झाला आहे. ibjarates.com या वेबसाईटनुसार आज 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 72070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. तर 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 66282 रुपये झाला आहे. 750 कॅरेट (18 कॅरेट) शुद्धसोन्याचा भाव 54,270 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 585 (14 कॅरेट) शुद्धसोन्याचा भाव 42331 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
मिस कॉल द्वारे पाहा दर
सोनं आणि चांदीचे दर IBJA द्वारे जारी केले जातात. यावर जीएसटी आणि दागिने बनवण्याचं शुल्क नाही. तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या किमतीत 1000 ते 2000 रुपयांचा फरक असू शकतो. तुम्ही मिस कॉलद्वारेही सोन्या-चांदीचे दर तपासून पाहू शकता. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता. त्यानंतर काही वेळात तुम्हाला एक मेसेज येईल आणि त्याद्वारे तुम्हाला दराची माहिती मिळेल. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा अधिकृतरित्या सोन्याचे दर अपडेट केले जातात.