Join us  

सोन्याला पुन्हा झळाळी! १० ग्रॅमच्या किमतीत मोठा बदल, पाहा आजचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 2:24 PM

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होण्याचा ट्रेंड

Gold Prices Silver Rates: दीड महिन्यापूर्वी 58900 च्या जवळ पोहोचलेल्या सोन्याने पुन्हा तेजीचा विक्रम केला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 च्या विक्रमी दराला स्पर्श केला होता. फेब्रुवारीनंतर सोने 55000 पर्यंत खाली आले होते. मात्र आता पुन्हा यात वाढ होण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी चांदीने 71500 चा स्तर गाठला होता. नंतर तो 10,000 रुपयांनी घसरून 61,500 रुपये किलो झाला. मात्र आता पुन्हा सोन्या-चांदीच्या किमती वाढण्याचा ट्रेंड दिसतोय. या दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ होईल, अशी आशा गेल्या काही दिवसांपासूनचा ट्रेंड पाहता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आजचे सोने-चांदीचे दर

शुक्रवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी या दोन्ही भावात वाढ दिसून आली. सोन्याचा भाव 246 रुपयांच्या वाढीसह 58,252 रुपयांवर तर चांदीचा भाव 723 रुपयांच्या वाढीसह 67,254 रुपयांवर आहे. मल्टि-कमोडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोन्याचा भाव 58,006 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 66,531 रुपये प्रति किलो होता. एक दिवसापूर्वी सोन्याचांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून आली होती. शुक्रवारी सराफा बाजारात फारशी रेलचेल दिसली नाही. इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोने 182 रुपयांनी घसरून 58,159 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 374 रुपयांनी घसरून 66,937 रुपये प्रति किलो झाला.

जाणकारांचा अंदाज

सोन्याचा भाव 65,000 रुपये आणि चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जात आहे. जागतिक बाजारातील मंदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दोन्ही दरात चढ-उतारांचा काळ असल्याने हा ट्रेंड दिसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :सोनंचांदी