नवी दिल्लीः देशभरात सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं महागल्यानं दिल्लीतल्या सराफा बाजारात 10 ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्यामागे 50 रुपये वाढले आहेत. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, दिल्लीत 10 ग्राम सोन्याची किंमत 38,770 रुपयांवरून वाढून 38,820 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्यासारखेच चांदीचे दरही तेजीनं वाढत आहेत. एक दिवसातच एक किलोग्राम चांदीचा भाव 1140 रुपयांनी वाढला असून, आता 45040 रुपये प्रति किलोग्रामवर सोनं पोहोचलं आहे.
सोन्या-चांदीचे नवे दरः दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याचे दर 50 रुपयांनी तेजीनं वाढून प्रति 10 ग्रामसाठी 38820 रुपयांवर पोहोचले आहेत. तर राजधानीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याचे दर 50 रुपयांनी वाढून 38650 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले आहेत. तसेच 8 ग्रामवाल्या सोन्याचे वळाची किंमत 200 रुपयांनी वाढून 28800 रुपये प्रति 8 ग्रामवर पोहोचलं आहे.
चांदीचा भावही 1100 रुपयांनी भडकला- चांदीची किंमत 1140 रुपयांनी वाढून 45040 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. चांदीच्या नाण्यांचा भाव लिवाल 91,000 रुपये आणि बिकवाल 92,000 रुपये प्रति शेकडा आहे.
'या' पाच कारणास्तव महागलं सोनं
1. जगभरातल्या अर्थव्यवस्थांमध्ये सुस्ती आल्यानंतर गुंतवणूकदारांचं सोन्याप्रति आकर्षण वाढलं आहे. जागतिक स्तरावर आर्थिक वाढ होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टवरून समोर आलं आहे.
2. जगभरातल्या केंद्रीय बँका म्हणजेच भारतातल्या आरबीआयनं सोने खरेदी करणं वाढवलं आहे. चीन, रशिया, तुर्कस्थानसह जगभरातल्या केंद्रीय बँकांनी सोने खरेदीवर गोल्ड रिझर्व्ह ठेवलं आहे. जगभरात 2019-20पर्यंत जवळपास 374 मेट्रिक टन सोने खरेदी करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आरबीआयनं मार्च 2018मध्ये आतापर्यंत 60 टन सोने खरेदी केलं होतं.
3. अमेरिकेनं गेल्या 11 वर्षांमध्ये पहिल्यांदाच व्याजदरात कपात केली आहे. जेव्हा जेव्हा अमेरिका व्याजदरात कपात करतो, त्यावेळी सोन्याचे दर वाढतात.
4. अमेरिका-चीनदरम्यान सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेही देशभरातल्या अर्थव्यवस्थांना झटका बसला आहे. त्यामुळे जगातला व्यापार अस्थिर झाला आहे. 11 वर्षांत पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत यूआन सातच्या स्तराच्या खाली आला आहे.
5. अमेरिका-इराणदरम्यान टेन्शन लागोपाठ वाढतच चाललं आहे. त्यामुळे लोकांची सोन्याचे आवड वाढली आहे.
'या' 5 कारणांमुळे सोनं महागतंय! चांदीही उच्चांकावर, जाणून घ्या नवे दर
देशभरात सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 05:26 PM2019-08-21T17:26:44+5:302019-08-21T17:26:56+5:30