Join us

सोने घसरले; चांदी मात्र सावरली

By admin | Published: September 30, 2015 11:58 PM

परदेशी बाजारात घटलेली मागणी आणि जवाहिऱ्यांकडूनही अल्प प्रतिसाद यामुळे सलग चौथ्या दिवशी सोने घसरले. सोने १० ग्रॅममागे १७५ रुपयांनी घसरून २६,४०० रुपये झाले

नवी दिल्ली : परदेशी बाजारात घटलेली मागणी आणि जवाहिऱ्यांकडूनही अल्प प्रतिसाद यामुळे सलग चौथ्या दिवशी सोने घसरले. सोने १० ग्रॅममागे १७५ रुपयांनी घसरून २६,४०० रुपये झाले. दुसरीकडे उद्योग आणि नाणे उत्पादकांकडून किरकोळ मागणी वाढल्याने चांदी किलोमागे ५० रुपयांनी वधारून ३४,७५० रुपये झाली.अमेरिकी फेडरल बँकेने तूर्त व्याजदर वाढविले नसले तरीही चालू वर्षअखेरीस व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने परदेशात सोन्याला मागणी होती. त्याचा परिणाम येथेही झाला.जागतिक पातळीवर सोने ०.४ टक्क्यांनी घसरून सिंगापुरात तो भाव ११२३.०३ अमेरिकी डॉलर प्रतिऔंस असा झाला. परदेशात सोन्याचा हा कल असताना डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा सावरल्याने आयात स्वस्त झाली. त्याचाही परिणाम सोन्याच्या भावावर झाला.राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव १७५ रुपयांनी घसरून ते अनुक्रमे २६,४०० आणि २६,२५० रुपये झाले. गेल्या तीन सत्रात सोने ६७५ रुपयांनी घसरले आहे. सोन्याची ही स्थिती असताना चांदी मात्र ५० रुपयांनी वधारून ३४,७५० रुपयांवर पोहोचली. चांदीच्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीचे भाव मात्र स्थिर राहिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)