Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने घसरले!

सोने घसरले!

जागतिक बाजारातील कमजोर कल आणि ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी यामुळे शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या भावात घसरण झाली.

By admin | Published: October 22, 2016 01:58 AM2016-10-22T01:58:45+5:302016-10-22T01:58:45+5:30

जागतिक बाजारातील कमजोर कल आणि ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी यामुळे शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या भावात घसरण झाली.

Gold slumped! | सोने घसरले!

सोने घसरले!

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर कल आणि ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी यामुळे शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. सोने १४0 रुपयांनी उतरून ३0,४00 रुपये तोळा झाले. चांदी ४00 रुपयांनी उतरून ४२,३00 रुपये किलो झाली.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून असलेले सोन्याचे महत्त्व कमी झाले. त्यातच दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनीही बाजाराकडे पाठ फिरविली. त्यामुळे बाजार खाली आला. सिंगापुरातील बाजारात सोने 0.३१ टक्क्यांनी घसरून १,२६१.३0 डॉलर प्रति औंस झाले. चांदीही 0.३७ टक्क्यांनी घसरून १७.४३ डॉलर प्रति औंस झाली. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १४0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,४00 रुपये आणि ३0,२५0 रुपये किलो झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold slumped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.