Join us  

Gold : अचानक अनेक टन साेने खरेदी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 11:49 AM

Gold : यावर्षी जगभरात माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेत आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडूनही खरेदी हाेत आहे. मात्र, एक देश इतर देशांच्या तुलनेत अनेक पट साेने विकत घेत आहे.

टाेकियाे : यावर्षी जगभरात माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेत आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडूनही खरेदी हाेत आहे. मात्र,  एक देश इतर देशांच्या तुलनेत अनेक पट साेने विकत घेत आहे. ताे म्हणजे, चीन. पण का? हा प्रश्न सर्वच देशांना पडला आहे.

सर्वच देशांना पडला प्रश्नn चीनने क्वचितच आपल्याकडील  सोन्याच्या भांडाराची माहिती जाहीर केली  आहे. यापूर्वी २०१९ मध्ये चीनने माहिती दिली हाेती. n जागतिक सुवर्ण परिषदेच्या माहितीनुसार, यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत विविध देशांनी ३९९.३ टन साेने खरेदी केले हाेते. n यापूर्वीच्या तिमाहीत हा आकडा १८६ टन हाेता. चीनने गेल्या तिमाहीत सुमारे ३०० टन साेने खरेदी केल्याचा अंदाज आहे.

कशामुळे एवढी खरेदी?आर्थिक मंदीच्या संकट ओढावल्यास साेने खरेदी वाढते, असा यापूर्वीचा अनुभव आहे. युक्रेन युद्धानंतर रशियावर निर्बंध टाकण्यात आले आहे. त्यानंतर अनेक देशांनी अमेरिकन डाॅलर्सवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी साेने खरेदी वाढविली आहे. पश्चिमविराेधी देशांकडून साेने खरेदी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

२००० टन साठा रशियाकडे 

टॅग्स :सोनंव्यवसायचीन