लंडन / नवी दिल्ली : अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षापर्यंत व्याजदर वाढविणार नसल्याची शक्यता बळावल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने सहा आठवड्यातील उच्चांक गाठला. भारतात मात्र सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.
१.६ टक्क्यांनी वधारत सोन्याचा भाव प्रति औंस १,१५७.१५ डॉलरवर गेला. चांदीचा भावही १.९ टक्क्यांनी झळाळत प्रति औंस
१५.९८ डॉलरवर गेला. दरम्यान, अमेरिकी फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की, अमेरिकी अर्थव्यवस्था सुधारत असली तरी सावधगिरी म्हणून बेरोजगारीसह इतर आनुषंगिक आकडेवारी जारी होण्याची वाट पाहिली जाईल, असे बैठकीनंतर अमेरिकी फेडरलने जारी केलेल्या इतिवृत्तात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
सोने ६ सप्ताहांच्या उच्चांकावर
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षापर्यंत व्याजदर वाढविणार नसल्याची शक्यता बळावल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने सहा आठवड्यातील उच्चांक गाठला.
By admin | Published: October 10, 2015 03:24 AM2015-10-10T03:24:23+5:302015-10-10T03:24:23+5:30