नवी दिल्ली : सलग अकराव्या दिवशी तेजी नोंदविताना सोने सहा आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे. राजधानी २ि२२दल्लीत ३६५ रुपयांच्या भाववाढीनंतर सोने २६,७00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. जागतिक पातळीवर सोने आणखी मजबूत झाल्यामुळे देशांतर्गत भावात वाढ झाली आहे.
गुरुवारी चांदीचा भावही वाढला. घसघशीत १ हजार रुपयांची वाढ नोंदवून चांदी ३६,३00 रुपये किलो झाली. औद्योगिक क्षेत्रातून तसेच नाणे निर्मात्यांनी केलेल्या खरेदीचा लाभ चांदीला मिळाला.
सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्याजदर वाढ सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोने खरेदीकडे मोर्चा वळविला आहे.
शेअर बाजारातील घसरणीचाही सोन्याला लाभ झाला. गुंतवणूकदारांनी शेअर्सऐवजी सोन्याला पसंती दिली.
जागतिक बाजारात सोने तेजीत असल्याचे दिसून आले. सिंगापुरात सोने 0.५ टक्क्याने वाढून १,१३९.५९ डॉलर प्रति औंस झाले. हा एक महिन्याचा उच्चांक आहे. तत्पूर्वी, काल सोने १.५ टक्क्याने वाढले होते. चांदीचा भाव 0.४ टक्क्याने वाढून १५.३८ डॉलर प्रति औंस झाला. काल चांदी ३ टक्क्यांनी वाढली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने सहा आठवड्यांच्या उच्चांकावर
सलग अकराव्या दिवशी तेजी नोंदविताना सोने सहा आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे. राजधानी २ि२२दल्लीत ३६५ रुपयांच्या भाववाढीनंतर सोने
By admin | Published: August 20, 2015 11:03 PM2015-08-20T23:03:22+5:302015-08-21T00:15:37+5:30