नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोन्याचा भाव सलग चौदाव्या दिवशी वाढला. १५0 रुपयांच्या वाढीसह सोने २७,५७५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी मात्र ३00 रुपयांनी उतरून ३६,३00 रुपये किलो झाली. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, सणासुदीचा काळ सुरू झाल्यामुळे सराफा बाजारात ग्राहकी वाढत आहे. सोमवारी दागिने निर्मात्यांनी सोन्याची खरेदी केल्याचे दिसून आले. हंगामी मागणी पूर्ण करण्यासाठी दागिने निर्माते खरेदी करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचा भाव वाढला. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर सोने घसरणीचा कल दर्शवीत असताना राजधानी दिल्लीसह भारतात तेजीचे वातावरण दिसून आले. सिंगापुरातील बाजारात सोने 0.२ टक्क्यांनी उतरून १,१५८.१0 डॉलर प्रति औंस झाले, तसेच चांदी १.२ टक्क्यांनी उतरून १५.१४ डॉलर प्रति औंस झाली. सोने तेजीत असताना चांदीला मात्र घसरणीचा सामना करावा लागला. तयार चांदीचा भाव ३00 रुपयांनी घसरून ३६,३00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा ३४0 रुपयांनी घसरून ३५,८६0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र खरेदीसाठी ५२ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५३ हजार रुपये प्रति शेकडा असा कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,५७५ आणि २७,४२५ रुपये प्रति तोळा राहिला. गेल्या १३ दिवसांत सोने २,४४५ रुपयांनी वाढले आहे. सोन्याच्या ८ ग्रॅम गिन्नीचा भाव १00 रुपयांनी वाढून २२,७00 रुपये झाला.
सोने तीन महिन्यांच्या उच्चांकावर
By admin | Published: August 25, 2015 4:08 AM