नवी दिल्ली : सराफा बाजारात सोने सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात वाढून दोन आठवड्यांच्या उच्चांकावर गेले. चांदीही १५0 रुपयांनी वाढली.
जागतिक तेजी आणि ज्वेलरांनी केलेली खरेदी या बळावर सराफ बाजार तेजीत राहिला. न्यूयॉर्कमध्ये सोने 0.५३ टक्क्यांनी वाढून १,२६८.९0 डॉलर प्रति औंस झाले. त्याच प्रमाणे चांदी 0.३४ टक्क्यांनी वाढून १७.६५ डॉलर प्रति औंस झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रत्येकी १६0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,५४0 रुपये आणि ३0,३९0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने दोन आठवड्यांच्या उच्चांकावर
सराफा बाजारात सोने सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात वाढून दोन आठवड्यांच्या उच्चांकावर गेले. चांदीही १५0 रुपयांनी वाढली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 01:55 AM2016-10-21T01:55:35+5:302016-10-21T01:55:35+5:30