Join us

सोने स्वस्त, तर चांदी झाली महाग

By admin | Published: October 24, 2015 4:29 AM

जागतिक बाजारात सोने वधारले असले तरीही स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांकडून मागणी घटल्याने सोने १३५ रुपयांनी स्वस्त होऊन १0 ग्रॅमला २७,२00 रुपये झाले.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोने वधारले असले तरीही स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांकडून मागणी घटल्याने सोने १३५ रुपयांनी स्वस्त होऊन १0 ग्रॅमला २७,२00 रुपये झाले. त्याचवेळी औद्योगिक प्रकल्प आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदीचे भाव ३८५ रुपयांनी वाढून ३७,२८५ रुपये झाले.गुरुवारी विजयादशमीदिनी नवरात्राची सांगता झाली. त्यामुळे ग्राहकांकडून सोन्याची मागणी घटल्याने व्यापाऱ्यांकडूनही फारसा उठाव नसल्याने सोन्याचे भाव घसरल्याचे जवाहिऱ्यांतर्फे सांगण्यात आले. जाागतिक बाजारात सोने 0.३ टक्क्यांनी वधारून त्याचा भाव सिंगापूर बाजारात ११६९.४0 अमेरिकी डॉलर प्रतिऔंस असा झाला. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी स्वस्त होण्याची शक्यता वाटत आहे. तसे झाल्यास सोन्याची आयातही स्वस्त होईल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतला.राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही सोन्याचे भाव १३५ रुपयांनी वाढून २७,२00 रुपये आणि २७,0५0 असे झाले. चांदीच्या नाण्याचे भावही १ हजार रुपयांनी वाढले. चांदीच्या १00 नाण्याच्या खरेदीचा दर ५२ हजार रुपये, तर विक्रीचा दर ५३ हजार रुपये झाला.