नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या भावात सोमवारी वाढ झाली. सोने १२0 रुपयांनी वाढून २६,४५0 रुपये तोळा झाले, तर चांदी ५५ रुपयांनी वाढून ३३,८५५ रुपये किलो झाली. या वाढीनंतर सोने दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेले आहे.
जागतिक बाजारातील तेजी, स्थानिक बाजारातील वाढती मागणी आणि शेअर बाजारात घसरलेले निर्देशांक ही सराफा बाजारातील तेजीची प्रमुख कारणे आहेत. औद्योगिक क्षेत्राकडून तसेच शिक्क्के निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीचा भाव वाढला.
जागतिक बाजारांपैकी प्रमुख असलेल्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव 0.४ टक्क्याने वाढून १,१0८.६५ डॉलर झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १२0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,४५0 रुपये आणि २६,३00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी सोने या पातळीवर होते. शनिवारी सोने २0 रुपयांनी उतरले होते. सोन्याच्या ८ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र २२,४00 रुपये असा स्थिर राहिला. सोन्याच्या मार्गावर चालताना तयार चांदी ५५ रुपयांनी वाढून ३३,८५५ रुपये किलो झाली. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी २५ रुपयांनी वाढून ३३,८00 रुपये किलो झाली. चांदीचे शिक्के १ हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ४९ हजार आणि विक्रीसाठी ५0 हजार प्रति शेकडा झाले.
सोने दोन महिन्यांच्या उच्चांकावर
सोन्या-चांदीच्या भावात सोमवारी वाढ झाली. सोने १२0 रुपयांनी वाढून २६,४५0 रुपये तोळा झाले, तर चांदी ५५ रुपयांनी वाढून ३३,८५५ रुपये किलो झाली. या वाढीनंतर सोने
By admin | Published: January 12, 2016 03:50 AM2016-01-12T03:50:46+5:302016-01-12T03:50:46+5:30