Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ६००० पदांसाठी बंपर भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ६००० पदांसाठी बंपर भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

SBI Bumper Recruitment: बँकेत नोकरी शोधत असलेल्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये बंपर भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ६ हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 03:35 PM2023-09-03T15:35:31+5:302023-09-03T15:35:56+5:30

SBI Bumper Recruitment: बँकेत नोकरी शोधत असलेल्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये बंपर भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ६ हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत.

Golden Job Opportunity in SBI, Bumper Recruitment for 6000 Posts, Eligibility and Conditions | SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ६००० पदांसाठी बंपर भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ६००० पदांसाठी बंपर भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

बँकेत नोकरी शोधत असलेल्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये बंपर भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ६ हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. एसबीआयने अप्रेंटिसर भरती २०२३ साठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ nsdcindia.org/apprenticeship किंवा apprenticeshipindia.org किंवा bfsissc.com किंवा Bank.sbi/careers किंवा www.sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एसबीआय अप्रेंटिस भरती २०२३ च्या नोटिफिकेशननुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार २१ सप्टेंबर किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणार्थींचं प्रशिक्षण भारतीय स्टेट बँकेसह एक वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी होईल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून, देशभरातील बँकांमध्ये एकूण ६१६० रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत
- एसबीआय अप्रेंटिस नोटिफिकेशन तारीख - ३१ ऑग्स २०२३ 
- एसबीआय अप्रेंटिस अर्जांची सुरुवात - १ सप्टेंबर २०२३ 
- एसबीआय अप्रेंटिससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ सप्टेंबर २०२३
- एसबीआय अप्रेंटिसच्या परीक्षेची तारीख - ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३

एसबीआय अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असावा. तर उमेदवाराचं किमान वय १ ऑगस्ट २०२३ पर्यंत २० वर्षांपर्यंत आणि कमाल वय २८ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. मात्र आरक्षित वर्ग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती नियमानुसार कमाल वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात येईल. याबाबतचं अधिकृत नोटिफिकेशन लक्षपूर्वक वाचावं.

एसबीआय अप्रेंटिस भरती २०२३ साठी निवड प्रक्रिया मागच्या भरती अभियानाप्रमाणेच आहे. उमेदवार ऑनलाइन लिखित परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या परीक्षेत उत्तीर्ण करून नोकरी मिळवू शकतो. ऑनलाइन परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये आयोजित करण्यात येईल. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल टेस्टसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.  

Web Title: Golden Job Opportunity in SBI, Bumper Recruitment for 6000 Posts, Eligibility and Conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.