Join us

कोसळत्या शेअर बाजारात गुंतवणुकीची सुवर्णसंधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 12:55 AM

सप्ताहात केवळ चारच दिवस मुंबई शेअर बाजारात व्यवहार झाले. सप्ताहाचा प्रारंभ बाजारात उत्साहाने झाला. संवेदनशील निर्देशांक ३६२७४.२५ असा वाढीव पातळीवर खुला झाला.

- प्रसाद गो. जोशीडॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाने घेतलेली नीचांकी डुबकी आणि खनिज तेलाच्या दराने घेतलेली उसळी, पतधोरणामध्ये सर्व दर कायम राखत रिझर्व्ह बॅँकेने दिलेला धक्का, परकीय वित्तसंस्थांचे विक्रीचे सातत्यपूर्ण धोरण, चालू खात्यावरील वाढती तूट अशा निराशेच्या वातावरणामुळे शेअर बाजारामध्ये गतसप्ताह कोसळता राहिला. संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये झालेली विक्रमी घसरण ही चिंता लावणारी आहे.सप्ताहात केवळ चारच दिवस मुंबई शेअर बाजारात व्यवहार झाले. सप्ताहाचा प्रारंभ बाजारात उत्साहाने झाला. संवेदनशील निर्देशांक ३६२७४.२५ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर तो ३६६१६.६४ आणि ३४२०२.२२ असा उच्चांकी व नीचांकी गेला. सप्ताहाच्या अखेरीस मात्र तो १८५०.१५ अंश(१२ टक्के) घसरून ३४३७६.९९ अंशांवर बंद झाला.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ६१४ अंश घसरून १०३१६.४५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांना चांगलाच तडाखा बसलेला दिसून येत आहे. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप १४००३.८१ (घट ७५९.३९) तर स्मॉलकॅप १३८४०.२६ (घट ५९०.४२) अंशांवर बंद झाले.डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठलेली नवीन नीचांकी पातळी आणि खनिज तेलाच्या किंमतींना आलेली उकळी यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण आहे. यामुळे चलनवाढ होण्याची तसेच चालू खात्यावरील तूट वाढून अर्थसंकल्पीय तूट वाढण्याची भीती आहे. त्यातच पतधोरणात रिझर्व्ह बॅँकेने सर्व दर कायम ठेवून बाजाराची निराशा केली. त्यामुळे घसरण आणखी तीव्र झाली. दरम्यान परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये बाजारातून ९३ अब्ज रुपये काढून घेतले आहेत. बाजारातील घसरण ही गुंतवणुकीची संधी मानून गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओ मजबूत केला पाहिजे. अनेक चांगले समभाग कमी किमतीत आहेत. जी क्षेत्रे घसरत आहेत, त्यातून बाहेर पडून चांगली खरेदी करण्याची ही सुसंधी दवडू नये.

पहिल्या सहामाहीत प्रारंभिक भागविक्री घटली- अस्थिर भांडवल बाजार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत लागून राहिलेली चिंता यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विविध आस्थापनांनी प्रारंभिक भागविक्री (आयपीओ)मधून उभारलेल्या रकमेत घट झाली आहे.- एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या पहिल्या सहा महिन्यांमध्ये १० आस्थापनांनी प्रारंभिक भांडवल विक्री करून १२,४७० कोटी रुपये जमा केले आहेत. मागील वर्षाच्या याच कालखंडामध्ये १५ आस्थापनांनी १६,५३५ कोटी रुपये उभारले होते. याचाच अर्थ चालू वर्षी हे प्रमाण ५३ टक्कयांनी घटले आहे.- व्यवसाय वृद्धीसाठी लागणारे भांडवल, कर्जाची परतफेड करणे, खेळते भागभांडवल अशा गरजा पूर्ण करण्यासाठी बहुदा प्रारंभिक भागविक्रीचा पर्याय स्वीकारला जातो. याशिवाय आस्थापनांच्या समभागांची नोंदणी शेअर बाजारात करण्यासाठीही प्रारंभिक भागविक्री केली जात असते.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक