Join us

नोकरीची सुवर्णसंधी! एचसीएल टेक्नॉलॉजी करणार फ्रेशर्सची मेगाभरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 7:50 AM

कोरोनामुळे व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

ठळक मुद्देएचसीएल टेक्नॉलॉजीकडून नव्या कर्मचाऱ्यांच्या मेगा भरतीची घोषणा एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये नव्या १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार कंपनी पूर्णपणे व्हर्च्युअल माध्यमातून भरती करणार

बंगळुरू - कोरोना विषाणू्च्या फैलावामुळे सध्या गंभीर संकट उभे राहिलेले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगसारखे निर्बंध वारंवार लागू करावे लागत असल्याने त्याचा विपरित परिणाम उद्योगधंदे आणि अर्थविश्वावर होत आहे. व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीने नव्या कर्मचाऱ्यांच्या मेगा भरतीची घोषणा केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये नव्या १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.  कॉलेज कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ही भरती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून ९ हजार पदांची भरती केली होती.

याबाबत कंपनीचे एचआर हे अप्पाराव व्हीव्ही यांनी सांगितले की, ही भरती दोन प्रमुख पातळ्यांवर होणार आहे. यामध्ये ग्रोथ आणि रिक्त पदे भरली जातील. गेल्या आणि चालू तिमाहीमध्ये कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एट्र्रिशन रेट खूप कमी झालाआहे. या तिमाहीमध्ये एट्रिशन रेट हा सिंगल डिजिटच्या आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅक फिल हायरिंग कमी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोविड-१९ मुळे कॅम्पस हायरिंगमध्ये काही अडथळे येऊ शकतात. कारण कॅम्पस अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही झालेल्या नाहीत. दरम्यान, कंपनी पूर्णपणे व्हर्च्युअल माध्यमातून भरती करणार आहे. जूनमध्ये कंपनीने १ हजार कॅम्पस रिक्रुटमेंट केल्या आहेत. तसेच कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठीचा सरासरी पगार ३.५ लाखांपर्यंत आहे.

दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असले तरी जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीच्या उत्पादनक्षमतेत वाढ झाली आहे. कंपनीचे सुमारे ९६ टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. तर २ टक्के कर्मचारी त्यांची केंद्रे आणि उर्वरित २ टक्के कर्मचारी ग्राहकांकडे जाऊन काम करत आहेत, असेही अप्पाराव यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू

नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :व्यवसायनोकरीकर्मचारीभारत