Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार विविध पदांवर भरती, असा करा अर्ज

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार विविध पदांवर भरती, असा करा अर्ज

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. या सर्व पदांसाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही किमान पात्रता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:49 PM2020-06-24T15:49:59+5:302020-06-24T16:09:55+5:30

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. या सर्व पदांसाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही किमान पात्रता आहे.

Golden opportunity job in SBI; Recruitment for various posts will be done without examination | स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार विविध पदांवर भरती, असा करा अर्ज

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार विविध पदांवर भरती, असा करा अर्ज

Highlightsभारतीय स्टेट बँकेने स्पेशल कॅडर ऑफिसर्सच्या ११९ पदांसाठी भरती जाहीर केली आहेभरती प्रकियेसाठी अर्ज मागवण्यात आले असून, पात्र आणि इच्छुक उमेदवार १३ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतीलशॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे सध्या सर्वच क्षेत्रामधील नोकऱ्यांमध्ये घट झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय स्टेट बँकेने स्पेशल कॅडर ऑफिसर्सच्या ११९ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रकियेसाठी अर्ज मागवण्यात आले असून, पात्र आणि इच्छुक उमेदवार १३ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. तसेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली आहे.  

भरती जाहीर करण्यात आलेल्या स्पेशल कॅडर ऑफिसर्सच्या पदांचे विवरण आणि वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.

एसएमई क्रेडिट अॅनॅलिस्ट पदसंख्या २०, वयोमर्यादा २५ ते ३५

प्रॉडक्ट मॅनेजर, पदसंख्या ६, वयोमर्यादा ३५

मॅनेजर (डाटा अॅनालिस्ट), पदसंख्या २, वयोमर्यादा ४०

मॅनेजर (डिजिटल मार्केटिंग), पदसंख्या १, वयोमर्यादा ३५

फॅकल्टी, एसबीआयएल, कोलकाता, पदसंख्या ३, वयोमर्यादा २८ ते ५५

सिनियर एक्झिक्युटिव्ह (डिजिटल रिलेशन्स), पदसंख्या २,  वयोमर्यादा ३५

सिनियर एक्झिक्युटिव्ह ( अॅनॅलिटिक्स), पदसंख्या २, वयोमर्यादा  ३५

सिनियर एक्झिक्युटिव्ह (डिजिटल मार्केटिंग), पदसंख्या २,  वयोमर्यादा  ३५

बँकिंग सुपरवायझरी स्पेशालिस्ट, पदसंख्या १, वयोमर्यादा ६२

मॅनेजर (एनिटाइम चॅनेल), पदसंख्या १,  वयोमर्यादा ३७

डेप्युटी मॅनेजर (आयएस ऑडिट), पदसंख्या ८,  वयोमर्यादा ३५

व्हाइस प्रेसिडेंट ( स्ट्रेस्ट अॅसेट मार्केटिंग), पदसंख्या १, वयोमर्यादा ५०

चिफ मॅनेजर ( स्पेशल सिच्युएश टीम), पदसंख्या ३,  वयोमर्यादा ४२

डेप्युटी मॅनेजर (स्ट्रेस्ट अॅसेट मार्केटिंग), पदसंख्या ३,  वयोमर्यादा ३५

हेड ( प्रॉडक्ट, इ्न्व्हेस्टमेंट अँड रिसर्च), पदसंख्या १ वयोमर्यादा  ३५ ते ५०

सेंट्र्ल रिसर्च टीम ( पोर्टफोलिओ अॅनॅलिसिस अँड डाटा अॅनॅलिटिक्स),  पदसंख्या १, वयोमर्यादा ३० ते ४०

इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, पदसंख्या ९, वयोमर्यादा २८ ते ४०

प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी), पदसंख्या १,  वयोमर्यादा २५ ते ४०

 रिलेशनशिप मॅनेजर, पदसंख्या  ४८,  वयोमर्यादा २३ ते ३५

रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), पदसंख्या ३,  वयोमर्यादा २८ ते ४०

या भरतीमधील उमेदवारांसाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही. तर शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. या सर्व पदांसाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही किमान पात्रता आहे. इच्छुक उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या sbi.co.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी प्रवेश शुल्क ७५० रुपये इतके आहे. जनरल, इडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गांसाठी हे प्रवेश शुल्क लागू असेल. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गांना कुठलेही प्रवेश शुल्क नसेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

Web Title: Golden opportunity job in SBI; Recruitment for various posts will be done without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.