Join us

गोल्डमॅन सॅक्स, जेपी मॉर्गनला दिसली Adani समूहात कमाईची संधी, ट्रेडिंग क्लायंट्सला दिला हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 6:17 PM

गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक आणि जेपी मॉर्गन अँड चेज कंपनीला अदानी समूहाच्या काही असेट्समध्ये काही कमाईच्या संधी दिसून येत आहेत.

गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक आणि जेपी मॉर्गन अँड चेज कंपनीला अदानी समूहाच्या काही असेट्समध्ये काही कमाईच्या संधी दिसून येत आहेत. गौतम अदानी यांच्या बिझनेस एम्पायरशी निगडीत असलेल्या बॉन्ड्स आणि काही असेट्समध्ये मजबूती असून त्या मूल्य देऊ शकता, असं या कंपन्यांनी आपल्या काही क्लायंट्सना सांगितलंय. गुरुवारी गुंतवणूकदारांच्या कॉल दरम्यान, गोल्डमन सॅक्सच्या ट्रेडिंग एक्झिक्युटिव्ह्सनी असं सांगितलं की अदानींचे कर्ज शॉर्ट टर्ममध्ये उच्चांकावर पोहोचले आहे, तसंच अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. सध्याच्या मूल्यानुसार बाँड व्हॅल्यूवर आकर्षक झाले आहेत. त्याच वेळी, अदानीच्या स्टेक विक्री अर्थात FPO मागे घेण्यापूर्वी, जेपी मॉर्गन क्रेडिटच्या विश्लेषकांनी ग्राहकांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे की त्यांना अदानीच्या काही कंपन्यांच्या कर्जातही मूल्य दिसत आहे.

वॉल स्ट्रीटच्या बँकांचं स्वारस्यइक्विटीमधील विक्री आणि TET मधील मंदीच्या दरम्यान अदानींच्या सिक्युरिटीजनं काही गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही बाँड्स चिंताजनक पातळीवर पोहोचले आहेत. यामुळे वॉल स्ट्रीटच्या सर्वात मोठ्या बँक क्लायंट्सचं भारतीय अब्जाधीशांच्या समस्या समजून घेण्यात रस वाढला आहे. अदानी समूह हे सध्या अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या निशाण्यावर आहे.

अदानी पोर्ट्सवर नजरगोल्डमन सॅक्समधील ट्रेडर्स अदानी पोर्ट्सच्या कर्जाचे वर्णन एक चांगली रोख असलेली कंपनी तसेच व्यापारासाठी पुरेसे लिक्विड म्हणून करतात. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्यांना अशी अपेक्षा आहे की संस्था त्याच्या बाँडचे रिफायनंस करण्यासाठी पुरेसे कार्यक्षम असेल, तर इक्विटी इन्व्हेस्टर्स आणि असेट्स विकण्याची पूर्ण शक्यता आहे.

गोल्डमॅनचं किती ट्रेडिंगगोल्डमन सॅक्सच्या प्रवक्त्याने क्लायंट कॉलवर भाष्य करण्यास नकार दिला. गोल्डमॅनने कॉलच्या आधी गुरुवारी अदानी बाँड्समध्ये १७ कोटी डॉलर्सचा व्यवहार झाला. यामुळेच ते आशियाबाहेरून जागतिक निधी आकर्षित करत आहेत आणि समस्यांचा सामना करणारे गुंतवणूकदार सुरुवातीच्या टप्प्यावर कर्ज घेण्यावर विचार करत आहेत.

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसाय