भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता आगामी काळात अनेक विक्रम मोडीत निघणार आहेत. सध्या भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे. सध्या जगात भारताशिवाय अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी आहे. किंबहुना, गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत नेत्रदीपक तेजीची नोंद झाली आहे, त्यामुळे क्रमवारीत सुधारणा झाली आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) च्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताची GDP वाढ ७.२% होती, जी या कालावधीत जगातील सर्वाधिक आहे.
भारताने ब्रिटनला सहाव्या क्रमांकावर टाकून पाचवा क्रमांक पटकावला आहे. २०२३ मध्ये भारताचा जीडीपी वाढून ३.७५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचला आहे. २०१४ मध्ये २ ट्रिलियन डॉलरच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.
IPO News: आता 'या' बँकेचा येणार IPO, २५ रुपयांना मिळणार शेअर; पैसे तयार ठेवा
दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बातमी आहे. भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. गोल्डमन सॅक्सने २०७५ पर्यंत भारत ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
ब्रोकरेज कंपनी गोल्डमन सॅक्सने अपडेट रिपोर्टमध्ये मोठा अंदाज वर्तवला आहे. या वित्तीय संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. २०७५ पर्यंत भारत अमेरिकेला अर्थव्यवस्था क्रमवारीत मागे टाकेल, असा दावा त्यांनी आपल्या अहवालात केला आहे. त्यावेळी केवळ चीन फार कमी फरकाने पुढे असेल.
गोल्डमॅन सॅक्सने सांगितले की, भारतात प्रतिभा, श्रमशक्ती आणि सर्वाधिक कामाचे वय असलेली लोकसंख्या अर्थव्यवस्थेला पुढे जाण्यासाठी बळ देईल. गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार १.४ अब्ज लोकसंख्येसह, भारत GDP चार्टमध्ये नाटकीयरित्या पुढे जाऊ शकतो. २०७५ पर्यंत, यूएस जीडीपीला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था ५२.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. या काळात फक्त चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा जास्त असेल, जी ५७ ट्रिलियन डॉलर्स असेल. तर अमेरिकेचा जीडीपी ५१.५ ट्रिलियन डॉलर असेल.