जळगाव : दिवाळीला सुरुवात झाली असून, धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी ग्राहकांना चांगली संधी मिळाली आहे. देशभरात सोन्याचे दर घटले असून, अनेक ठिकाणी दर ५० हजार रुपये तोळ्याच्या जवळपास आहेत. यंदा देशातील जनतेचा शॉपिंगचा मूड पाहता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोने- चांदीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या आठवड्यातच सोन्याचे दर अडीच हजार रुपयांनी वाढले होते. तरीही दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. याच काळात चांदीदेखील ५७ ते ५८ हजारांदरम्यान राहिली.
गेल्या दोन दिवसांपासून तर सोने- चांदीचे भाव पुन्हा कमी कमी होऊ लागले. गेल्या वर्षी सोन्याचे दर प्रती तोळा ४७ हजार ७०० रुपयांच्या जवळपास होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे दर घटलेधनत्रयोदशीचा सोने- चांदी खरेदीचा मुहूर्त जवळ येत असताना हे भाव कमी होत असल्याने यंदा खरेदी अजून वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने भावात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. धनत्रयोदशीला होणा-या एकुण विक्रीपैकी सोन्याचा वाटा सुमारे ७० टक्के असतो.
७० टनांपर्यंत यंदा होणार विक्री>> इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ५० टन एवढे सोने विविध स्वरूपात विकण्यात आले.>> यावर्षी हा आकडा ७० टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये सुमारे ३० टन एवढी सोन्याची विक्री झाली होती.>> त्यानंतर कोरोना काळात त्यात मोठी घट झाली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. भारतात दरवर्षी सुमारे ८०० मॅट्रीक टन एवढे सोने विकले जाते.