Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rate: साेन्याच्या ‘अक्षय्य’ खरेदीवर विरजण?, वाढलेल्या दरांमुळे यावर्षी कमी उलाढालीची शक्यता

Gold Rate: साेन्याच्या ‘अक्षय्य’ खरेदीवर विरजण?, वाढलेल्या दरांमुळे यावर्षी कमी उलाढालीची शक्यता

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेते. मात्र, यावेळी उच्चांकी पातळीवर असलेले भाव यावर विरजण टाकू शकतात. यंदा साेने खरेदी २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 04:48 AM2023-04-21T04:48:22+5:302023-04-21T04:49:00+5:30

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेते. मात्र, यावेळी उच्चांकी पातळीवर असलेले भाव यावर विरजण टाकू शकतात. यंदा साेने खरेदी २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. 

Gold's 'inexhaustible' purchases? | Gold Rate: साेन्याच्या ‘अक्षय्य’ खरेदीवर विरजण?, वाढलेल्या दरांमुळे यावर्षी कमी उलाढालीची शक्यता

Gold Rate: साेन्याच्या ‘अक्षय्य’ खरेदीवर विरजण?, वाढलेल्या दरांमुळे यावर्षी कमी उलाढालीची शक्यता

मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेते. मात्र, यावेळी उच्चांकी पातळीवर असलेले भाव यावर विरजण टाकू शकतात. यंदा साेने खरेदी २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. 

अक्षय्य तृतीयेला साेने खरेदी अतिशय शुभ मानली जाते. अनेक जण या दिवशी क्षमतेनुसार साेने खरेदी करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेले साेन्याचे दर ग्राहकांचा हिरमाेड हाेउ शकताे. 

सध्या साेन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. मात्र, दर वाढलेलेच असल्यामुळे त्याचा मागणीवर परिणाम हाेउ शकताे. दर कमी झाल्यास विक्री वाढू शकते, असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक खरेदी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हाेणाऱ्या उलाढालीत दक्षिण भारतीय राज्यांचा वाटा ४० टक्के राहताे. पश्चिम भारतात हे प्रमाण २५ टक्के तर पूर्वेकडे २० टक्के आहे. उत्तर भारतात १५ टक्के उलाढाल हाेते.

आवश्यक असेल तरच खरेदी
n देशातील बहुतांश भागात सध्या साेन्याचा ६० हजार रुपये ताेळा एवढा दर आहे. 
n भाव वाढल्यामुळे  सध्या अत्यावश्यक असेल तरच साेने खरेदी करण्यात येत आहे. 
n वाढलेल्या दराचा अक्षय्य तृतीयेला हाेणाऱ्या खरेदीवर परिणाम हाेउ शकताे.

अक्षय्य तृतीया शनिवारी असल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी भरपूर वेळ असेल. साेन्याचे दर ६० हजारांच्या आसपास असल्यास विक्रीत १० टक्के वाढ हाेउ शकते.
    - साैरभ गाडगीळ, अध्यक्ष 
    व एमडी, पीएनजी ज्वेलर्स

Web Title: Gold's 'inexhaustible' purchases?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.