Join us

कापसाला येणार ‘अच्छे दिन’! उत्पादन घटणार, भाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:06 AM

कापूस उत्पादनात यंदा ६.७८ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस कापसाचा शिल्लक साठा कमी असेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने (सीआयए) वर्तविला आहे.

- चिन्मय काळेमुंबई : कापूस उत्पादनात यंदा ६.७८ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस कापसाचा शिल्लक साठा कमी असेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने (सीआयए) वर्तविला आहे. यामुळे किमतीत वाढ होऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षा आहे.यंदा देशात ३४३ लाख २५ हजार गाठी (५८ लाख ३५ हजार टन) कापूस उत्पादित होईल, असा सीआयएचा आधीचा अंदाज होता, पण असोसिएशनने हा अंदाज आता ३४० लाख २५ हजार गाठींवर (५७ लाख ८४ हजार टन) आणला आहे.असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांच्यानुसार, २०१७-१८ मध्ये ३६५ लाख गाठी (६२ लाख ०५ हजार टन) कापसाचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात घट होईल. मागील वर्षी ६९ लाख गाठी (११ लाख ७३ हजार टन) कापूस निर्यात झाला होता. यंदा ही निर्यात ५३ लाख गाठींपर्यंत (९ लाख टन) घसरण्याचा अंदाज आहे. देशांतर्गत उत्पादन व निर्यात, या दोन्हीमध्ये घट झाली, तरी त्या तुलनेत आयातीत फार वाढीची शक्यता नाही. यामुळेच वर्षअखेरीस कापसाच्या शिल्लक साठ्यात घट होईल.मागील वर्षअखेरीस देशात ९२ लाख गाठी (१५ लाख ६४ हजार टन) कापूस शिल्लक होता. यंदा जेमतेम ६६ लाख गाठी (११ लाख २६ हजार टन) कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. सूतगिरण्या व कापड उद्योगांकडून ३२४ लाख गाठींची मागणी असते, पण वस्त्रोद्योगाला नवी झळाळी येण्याची शक्यता असल्याने, मागणी वाढल्यास ही शिल्लक फार कमी असेल व त्यातून कापसाला चांगली किंमत मिळू शकेल.राज्यातील कापूस उत्पादनात घटदेशभरातील एकूण उत्पादनापैकी २२ टक्के कापूस महाराष्टÑात तयार होतो, तर महाराष्टÑ, गुजरात आणि मध्य प्रदेश या मध्य क्षेत्र मानल्या जाणाºया तीन राज्यांत मिळून ५५ टक्के उत्पादन होते.महाराष्टÑात मागील वर्षी ८३ लाख गाठी (१४ लाख ११ हजार टन) कापूस तयार झाला होता. यंदा मात्र, ७९ लाख गाठी (१३ लाख ४३ लाख टन) उत्पादनाचा अंदाज सीआयएने वर्तविला आहे.

टॅग्स :कापूसव्यवसायभारत