Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने ग्राहकांसाठी लग्नसराईत अच्छे दिन !

सोने ग्राहकांसाठी लग्नसराईत अच्छे दिन !

राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळून २८,०९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

By admin | Published: February 5, 2015 02:28 AM2015-02-05T02:28:56+5:302015-02-05T02:28:56+5:30

राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळून २८,०९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

Good day for the gold customers! | सोने ग्राहकांसाठी लग्नसराईत अच्छे दिन !

सोने ग्राहकांसाठी लग्नसराईत अच्छे दिन !

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळून २८,०९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्माते यांच्या मागणीत घसरण झाल्याने चांदीचा भाव ५० रुपयांनी घटून ३८,४०० रुपये प्रतिकिलो राहिला.
आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांची मागणी सध्याच्या पातळीवरून घटली. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात घट होत असल्याने ग्राहकांसाठी काहीसा दिलासा आहे. न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव १.०८ टक्क्याने घटून १२६०.१० डॉलर प्रतिऔंस राहिला. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १८० रुपयांच्या आपटीसह अनुक्रमे २८,०९० रुपये व २७,८९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,००० रुपयांवर कायम राहिला. (वृत्तसंस्था)

Web Title: Good day for the gold customers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.