Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेशनकार्ड धारकांना 'अच्छे दिन'; आता कोणत्याही सरकारी दुकानातून घेता येणार धान्य 

रेशनकार्ड धारकांना 'अच्छे दिन'; आता कोणत्याही सरकारी दुकानातून घेता येणार धान्य 

रेशन कार्ड धारकांना मोदी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 12:35 PM2019-08-01T12:35:20+5:302019-08-01T12:35:26+5:30

रेशन कार्ड धारकांना मोदी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.

'Good day' to ration card holders; Grain can now be purchased from any government shop | रेशनकार्ड धारकांना 'अच्छे दिन'; आता कोणत्याही सरकारी दुकानातून घेता येणार धान्य 

रेशनकार्ड धारकांना 'अच्छे दिन'; आता कोणत्याही सरकारी दुकानातून घेता येणार धान्य 

नवी दिल्लीः रेशन कार्ड धारकांना मोदी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. उत्तराखंडातल्या रेशनकार्ड लाभार्थ्यांना रस्त्यावर असलेल्या सरकारी दुकानातून रेशन घेता येणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अॅक्ट(एनएफएसए)अंतर्गत रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुविधा देण्याच्या तयारीत आहे. या व्यवस्थेअंतर्गत उत्तराखंडमधील 23 लाख लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी दुकानातून धान्य घेता येणार आहे.

त्यासाठी प्रत्येक गल्ली-बोळातल्या दुकानात सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस)अंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेता येणार आहे. एनएफएसएअंतर्गत रेशन कार्ड आणि सदस्यांची माहिती ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये टाकली जाणार आहे. जेणेकरून स्वस्त धान्य विक्रेत्यांच्या ई-पास मशिनला हे सॉफ्टवेअर लिंक होणार आहे. 
अशी असेल प्रक्रिया
पोर्टेबिलिटीअंतर्गत लाभार्थाला दुसऱ्या जागेवरच्या रेशनिंगच्या दुकानात जाऊन बायोमॅट्रिक सिस्टीमद्वारे थंब इंप्रेशनच्या माध्यमातून रेशन मिळवता येणार आहे. सरकारनं पीडीएस सिस्टम सॉफ्टवेअर अपडेटही केलं आहे. जर एखाद्या ग्राहकानं लागोपाठ तीनदा अशा दुकानातून अन्न-धान्य खरेदी केल्यास तो नोंदणीकृत होणार असून, त्याला धान्याचा पुरवठा होणार आहे. 

Web Title: 'Good day' to ration card holders; Grain can now be purchased from any government shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.