नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी एलआयसीच्या एकूण नफ्यात ४९ टक्के इतकी घसघशीत वाढ झाली आहे. यामुळे एकूण भांडवली मूल्याच्या बाबतीत एलआयसी देशातील सर्वांत मोठी पाचवी कंपनी बनली आहे. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ४९ टक्क्यांनी वाढून ९,४४४ कोटींवर पोहोचला. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा ६,३३४ कोटी रुपये इतका होता.
एलआयसीच्या संचालक मंडळाने शेअरधारकांना प्रत्येक शेअरमागे ४० टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ या कालावधीत कंपनीला प्रीमिअमपोटी १,१७,०१७ कोटी रुपये मिळाले.