Join us

शेअर बाजारावर लसीचा चांगला प्रभाव, परकीय वित्तसंस्थांची बाजारात मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 3:31 AM

सातत्याने वर जाणाऱ्या बाजारामध्ये संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टी दररोज नवनवीन विक्रम नोंदवित आहेत. गतसप्ताहामध्ये या निर्देशांकांनी अनुक्रमे ४९,७९५.१५ आणि १४,५९५.६० अशा उच्चांकांची नोंद केली आहे. 

प्रसाद गो. जोशी

सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये झालेली चांगली खरेदी आणि उत्तरार्धामध्ये नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीचे नवीन उच्चांक, लस उपलब्ध होणार असल्यामुळे गुंतवणूकदरांमध्ये निर्माण झालेला उत्साह, विविध आस्थापनांचे संमिश्र निकाल आणि जगभरातील बाजारांमध्ये असलेले काहीसे सकारात्मक वातावरण यामुळे भारतात सप्ताह चांगला राहिला. अखेरच्या दिवशी झालेल्या विक्रीनंतरही प्रमुख निर्देशांकांनी वाढ दाखविली. मिडकॅप व स्माॅलकॅपमध्ये मात्र घट झाली.सातत्याने वर जाणाऱ्या बाजारामध्ये संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टी दररोज नवनवीन विक्रम नोंदवित आहेत. गतसप्ताहामध्ये या निर्देशांकांनी अनुक्रमे ४९,७९५.१५ आणि १४,५९५.६० अशा उच्चांकांची नोंद केली आहे. परकीय वित्तसंस्थांची बाजारात मोठी गुंतवणूक -परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १४,८६६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या संस्थांनी समभागांमध्ये १८,४९० कोटी रुपये गुंतवले. त्याचप्रमाणे बॉण्डमधून ३,६२४ कोटी रुपये काढून घेतले आहेत. याचाच अर्थ १५ दिवसांमध्ये या संस्थांनी १४,८६६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनी गतसप्ताहात बाजारामध्ये ७,४४४.९४ कोटी रुपयांची विक्री करून नफा कमविण्याचे धोरण कायम राखले आहे. 

नजर अर्थसंकल्पावरबाजाराला आता अर्थसंकल्पाचे वेध लागले असून बाजारात करेक्शन येण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहात येणारे विविध आस्थापनांचे तिमाही निकाल, कोरोना लसीचा प्रभाव, या घटकांचा बाजारावर प्रभाव राहील.सप्ताहातील स्थिती -निर्देशांक                बंद मूल्य           बदलसंवेदनशील            ४९,०३४.६७      +२५२.१६निफ्टी                     १४,४३३.७०      +८६.४५मिडकॅप                 १८,९०४.१४       -२३४.५८स्मॉलकॅप                १८,६८२.१२      -२२६.४७

टॅग्स :शेअर बाजारकोरोनाची लसशेअर बाजार